Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakhe Agrowon
ॲग्रो विशेष

CM Eknath Shinde : वाघनखे शिवरायांच्या शौर्याचे प्रतीक : शिंदे

Team Agrowon

Satara News : ‘‘शिवरायांनी अफझल खानाला संपविण्यासाठी वापरलेली ही वाघनखे म्हणजे महाराष्ट्राची शान आहेत. राज्याच्या दृष्टीने हा भाग्याचा व आनंदाचा क्षण आहे. अनेक वर्षांची तपश्चर्या फळाला आली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ही संधी उपलब्ध झाली आहे. सरकारने दिलेला शब्द पाळला आहे.

शिवप्रेमींसाठी वाघनखांच दर्शन म्हणजेच छत्रपतींच्या शौर्याचे, वीरतेचे दर्शन होणार आहे. या वाघनखावर आक्षेप म्हणजे छत्रपतींच्या पराक्रमाचा वीरतेचा अपमान केल्यासारखे आहे. शिवभक्त हे कदापि सहन करणार नाहीत. छत्रपतींचे मावळे व शिवभक्तच विरोधकांना याचे उत्तर नक्की देतील,’’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

लंडनहून साताऱ्यात आणण्यात आलेल्या वाघनखांच्या शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाचा शुक्रवारी (ता. १९) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे, महेश शिंदे, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत, नरेंद्र पाटील, व्हिक्टोरिया अलबर्ट म्युझीयम लंडनचे निकोलस मर्चंट, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, की प्रतापगडाच्या जिर्णोधाराचे काम सुरू असून या कामासाठी उदयनराजेंच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच प्रतापगड विकासासाठी दीडशे कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातून प्रतापगडाचे पूर्वीचे वैभव पुन्हा आणण्याचे काम राज्य सरकार करेल. वाघनखांबाबत विनाकारण वाद निर्माण करणाऱ्यांना श्री. फडणवीस यांनी सुनावले.

चार विशेष टपाल तिकिटांचे अनावरण

छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयातील शस्त्रास्त्रांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन पटामधील महत्त्वाच्या वस्तूंवरील चार विशेष टपाल तिकिटाचे अनावरणही करण्यात आले. रायगड, सिंधुदुर्ग, राजमुद्रा तसेच जगदगुरू तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे चित्र असलेल्या तिकीटांचा यात समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT