Former Union Agriculture Minister Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Ethanol Price : साखर, इथेनॉलचे दर तातडीने वाढवा

Former Union Agriculture Minister Sharad Pawar : देशातील साखरेचे किमान विक्री दर कमी ठेवल्यामुळे तोट्यात जाणाऱ्या साखर उद्योगाची स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे केंद्राने तातडीने हस्तक्षेप करावा, असा मुद्दा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मांडला आहे.

मनोज कापडे

Pune News : देशातील साखरेचे किमान विक्री दर कमी ठेवल्यामुळे तोट्यात जाणाऱ्या साखर उद्योगाची स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे केंद्राने तातडीने हस्तक्षेप करावा, असा मुद्दा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मांडला आहे.

केंद्र शासनाने उसाच्या रास्त व किफायतशीर दरात (एफआरपी) वेळोवेळी वाढ केली आहे. मात्र, साखरेचे किमान विक्री दर (एमएसपी) वाढवलेले नाही. इथेनॉलचे दरदेखील परवडणारे नाही. त्यामुळे साखर कारखान्यांचा खर्च वाढून नफा मात्र घटला आहे.

त्यामुळे अडचणीत आलेल्या साखर उद्योगाने ही बाब श्री.पवार यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे साकडे घातले आहे. त्यामुळे श्री.पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांना व्यक्तिगत पत्र लिहिले आहे.

‘‘महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या संघाने यापूर्वी एकत्र बैठक घेत साखरेचे किमान विक्री दर व इथेनॉलचे दर वाढवून मिळण्यासाठी केंद्राकडे विनंती केली आहे. या मुद्द्यांबाबत केंद्रीय अन्न मंत्रालयाकडे हस्तक्षेप करण्यासाठी मी १५ जून २०२४ रोजी एका पत्रान्वये आपले लक्ष वेधले होते.

आता २०२४-२५ मध्ये उसाची एफआरपी प्रतिटन ३४०० रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु, बाजारातील साखरेचे दर कोसळून प्रतिक्विंटल ३३००-३३४० रुपयांपर्यंत आलेले आहेत. त्यामुळे साखर उद्योगातील आर्थिक तोटे वाढले आहेत. ही स्थिती देशातील शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून देण्यासाठी अजिबात हिताची नाही,’’ असे श्री.पवार यांनी पंतप्रधानांना उद्देशून या पत्रात नमूद केले आहे.

श्री. पवार या पत्रात पुढे म्हणतात, की साखर उद्योगातील ही स्थिती पुढे अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे आपण हस्तक्षेप करावा व साखरेचे किमान विक्री मूल्य प्रतिक्विंटल ४०५१ रुपयांपर्यंत वाढवावे.

केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांना यापूर्वी साखर संघाने पाठवलेले निवेदनदेखील मी तुम्हाला पाठवत आहे. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय कॅबिनेट समितीने २०२४-२५ मधील इथेनॉल उत्पादन वर्षातील इथेनॉलचे दर वाढविण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.

‘लवकरच चांगला निर्णय अपेक्षित’

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राचे खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी स्वागत केले आहे. श्री.पवार यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्राकडून साखरेची एमएसपी व इथेनॉलचे विक्रीदर वाढविण्याबाबत केंद्राकडून लवकरच चांगला निर्णय अपेक्षित आहे, असे खासगी साखर उद्योगातील सूत्रांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT