Nanded News : नांदेडला मंगळवारी (ता. ९) सायंकाळी पाचच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. हा पाऊस नांदेड, अर्धापूर, कंधार, लोहा, भोकर, हदगाव, किनवट व नायगाव तालुक्यांत झाला.
लोहा तालुक्यात वीज पडून तीन जनावरे दगावली. तसेच पिकांचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. नांदेड जिल्ह्यात आठ ते बारा एप्रिलदरम्यान अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला होता.
त्यानुसार जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वारे वाहू लागले. पावसादरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. पावसाच्या शक्यतेने शेतकरी मात्र धास्तावले.
पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज असल्यामुळे शेतकरी सावध होऊन शेती पिकाचे संरक्षण करण्यासाठी गुंतले आहेत. पावसादरम्यान वीज पडून भोपाळवाडी कलंबर बुद्रुक (ता. लोहा) येथील दिलीप पाटील भोपाळे यांची म्हैस मृत्युमुखी पडली.
तसेच जामगा शिवनी (ता. लोहा) येथील अमीन शेख यांचे दीड लाख रुपये किमतीचे दोन बैल वीज पडून मृत्युमुखी पडले. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात उद्यापर्यंत (ता. १२) पावसाचा अंदाज आहे. जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.