Hailstorm Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : नांदेडला किनवट, मुखेड तालुक्यात अवकाळी पाऊस

Crop Damage : नांदेड जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून अवकाळी पावसाने मुक्काम केला आहे.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून अवकाळी पावसाने मुक्काम केला आहे. हा पाऊस वेगवेगळ्या भागांत होत असल्याने शेती पिकांचे नुकसान होत आहे.

सोमवारी (ता. २२) जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला. हा पाऊस किनवट व मुखेड तालुक्यात सर्वाधिक होता. पावसादरम्यान वीज पडून भोकर तालुक्यात एक बैल ठार झाल्याची माहिती मिळाली.

नांदेड जिल्ह्यात एप्रिलमध्ये ठराविक दिवसांनंतर अवकाळी पाऊस होत आहे. या पावसामुळे भाजीपाला, फळपीक तसेच उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी सावध झाले आहेत.

परंतु अनेक भागांत मात्र शेती पिकांचे नुकसान होत असल्याची माहिती मिळाली. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सातशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याच्या अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता. यानंतर पुन्हा अवकाळीची शक्यता असल्याने नुकसानीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

सध्या आंबे काढणीला आले आहेत. या आंबा बागांना वादळी वारे तसेच पावसाचा फटका बसत आहे. जिल्ह्यातील सर्वच भागांत सोमवारी अवकाळी पाऊस झाला. हा पाऊस मुखेड तालुक्यात सरासरी १०.५ मिलिमीटर तर किनवट तालुक्यात १५.६ मिलिमीटर झाला.

अधिक पाऊस झालेल्या मंडलांत येवती २८, चांडोळा ३०, पिंपरखेड २४, इस्लापूर ५३, बोधडी २५, जलधारा १५, शिंदगी १६, शिरजखोड येथे ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसादरम्यान वीज पडल्याने आमठाणा (ता. भोकर) येथील भीमराव किशन जाधव यांच्या बैलाचा मृत्यू झाला. दरम्यान, मंगळवारी (ता. २३) जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT