Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Rain : खानदेशात मेमध्ये तब्बल १५ दिवस पाऊस

Unseasonal Rain : खानदेशात मे महिन्यात पाऊस सुरू आहे. अनेक वर्षांनंतर मे महिन्यात १५ दिवसांपेक्षा अधिक दिवस पाऊस झाला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मे महिन्यात पाऊस सुरू आहे. अनेक वर्षांनंतर मे महिन्यात १५ दिवसांपेक्षा अधिक दिवस पाऊस झाला आहे. याचा फटका उन्हाळ हंगामासह पूर्वमशगातीच्या कामासही बसला आहे.

रब्बीला डिसेंबर २०२४ मध्ये गारपीट व पावसाने फटका बसला. उन्हाळ हंगामास या पावसाचा फटका बसला आहे. कांदा, भुईमूग, बाजरी या पिकांची हानी झाली आहे. अनेकांनी कांदा शेतातच झाकून ठेवला आहे. कांदा काढणीला मजूर मिळत नसल्याने अडचणीदेखील आहेत. कांदा दरात घसरण झाली आहे. दर्जा व अन्य प्रश्न खरेदीदार उपस्थित करीत आहेत. यात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे.

खानदेशात मागील आठवड्यात काही भागात सतत पाऊस होता तर काही भागात तुरळक, अल्प पाऊस अशी स्थिती होती. जळगाव जिल्ह्यात जळगाव, धरणगाव, चोपडा, एरंडोल, पारोळा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नवापूर भागात पाऊस होता. परंतु अन्य भागात तुरळक, अल्प असा पाऊस झाला.

ढगाळ वातावरण मात्र कायम आहे. कोरडे, सूर्यप्रकाशीत वातावरण मागील १७ ते १८ दिवस या महिन्यात नाही. यंदा प्रथमच मे महिन्यात अनेक दिवस पाऊस व नुकसान, अशी स्थिती आहे. उकाडा कायम आहे. परंतु ऊन कमी झाल्याने उष्णता फारशी जाणवत नसल्याची स्थिती आहे. पण उन्हाळ हंगाम अनेकांच्या हातून गेल्याची स्थिती आहे.

खानदेशात शेतीकामे ठप्प झाली आहेत. ज्या भागात पाऊस होता, त्या भागात शेतीकामे रखडत सुरू आहेत. काही भागात शेणखत ओले झाले आहे. ते शेतात पसरविणे कठीण झाले आहे. काळ्या कसदार जमिनीत पांझरा, तापी, अनेर नदीच्या क्षेत्रात वाफसा नाही. शेणखत वाहतूक, चारा वाहतूक रखडत सुरू आहे.

पाणीवापर कमी

पावसामुळे भाजीपाला, केळी, पपई पिकाला पााण्याची गरज कमी झाली आहे. मे महिन्यात केळी, पपईला मोठा फटका उष्णतेने मागील अनेक वर्षे बसला आहे. या काळात अनेकांच्या केळी बागा खराब व्हायच्या. पण यंदा मे महिन्यात पावसाळी स्थिती असल्याने बागांची स्थिती सुधारली. शेतकऱ्यांनी लागलीच खते दिली. यामुळे केळी, पपई बागांची स्थिती सुधारली आहे. तसेच सिंचनासाठी पाण्याची गरज कमी आहे. काही शेतकऱ्यांनी केळीचे रोज एक ते दीड तास सिंचन सुरू केले आहे. एप्रिलमध्ये उष्णतेत रोज चार ते पाच तास सिंचन करावे लागत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Insurance Compensation: सोयाबीन विम्याचे ११४६ कोटी मंजूर

Sugar Production Rises: साखर उत्पादनात सात टक्क्यांनी वाढ

Maha Annapurna Project: भात शेतीच्या कायापालटासाठी ‘महाअन्नपूर्णा प्रकल्प’

Drip Vendor Registration Issues: ठिबक विक्रेता नोंदणी रखडली

Vidarbha Heatwave: विदर्भात उष्ण लाटेची शक्यता

SCROLL FOR NEXT