Shetkari Sanghtana Agrowon
ॲग्रो विशेष

Anti-Farmer Policies : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांची संघटनांकडून होळी

Shetkari Sanghtana Protest : इथेनॉल निर्मिती, कांदा निर्यात, खाद्यतेल आयात आदींसंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी धोरणांची होळी विविध शेतकरी संघटनांनी सोमवारी (ता.११) येथे केली.

Team Agrowon

Satara News : इथेनॉल निर्मिती, कांदा निर्यात, खाद्यतेल आयात आदींसंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी धोरणांची होळी विविध शेतकरी संघटनांनी सोमवारी (ता.११) येथे केली. तसेच हे निर्णय डिसेंबरअखेर मागे न घेतल्यास सर्व शेतकरी संघटना नवीन वर्षाच्या सुरवातीला दिल्लीतील जंतर-मंतर येथे सरकारच्या विरोधात तीव्र बेमुदत आंदोलन करू असा इशारा केंद्र सरकारला देण्यात आला.

आंदोलनवेळी बळीराजा संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, जिल्हाध्यक्ष बीआरएस पार्टीचे विश्वास जाधव, शेतकरी कामगार पक्षाचे अॅड. समीर देसाई, बळीराजा संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष गणेश शेवाळे आदीं उपस्थित होते.

पंजाबराव पाटील म्हणाले, ‘‘केंद्र सरकारच्या इथेनॉल आणि कांदा निर्यातीवरील निर्बंधांमुळे ऊस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळत नाही. खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात केल्यामुळे सोयाबीन व तेलबिया पिकविणारा शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांवरील या सर्व संकटांना आपल्या केंद्र सरकारची आयात व निर्यात धोरण कारणीभूत आहेत. हे सर्व निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावे. इथेनॉल बनवण्यास साखर कारखान्याला परवानगी द्यावी, साखर व कांदा निर्यातीस तत्काळ परवानगी द्यावी,

आयात केलेल्या खाद्यतेलावर ५० टक्के आयात शुल्क लावून देशातील सोयाबीन पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा मागण्यावेळी करण्यात आल्या. यावेळी देवानंद पाटील, विश्वास जाधव, गणेश शेवाळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT