Nirmala Sitaraman Agrowon
ॲग्रो विशेष

Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्प २३ जुलै रोजी; अर्थमंत्री सितारामन अर्थसंकल्प करणार सादर

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलै ते २२ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरून दिले आहे.

Dhananjay Sanap

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन २३ जुलै रोजी संसदेत मांडणार आहेत. तर केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल २२ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलै ते २२ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरून दिले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी संसदेत २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प मांडला. देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुका पूर्वीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.

अर्थमंत्री निर्मला सितारामन सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी घोषणा केल्या जातील, अशी शक्यता आहे. अंतरिम अर्थसंकल्पात १.२७ लाख कोटींची तरतुद करण्यात आली होती. त्यामुळे यावेळी त्यामध्ये वाढ करण्यात येईल. तसेच पीएम किसान योजनेच्या निधीत वाढ करण्यात येईल. तसेच किमान आधारभूत किमतीची व्याप्ती वाढवण्यात येईल, असंही बोललं जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT