Angar Tehsil Office  Agrowon
ॲग्रो विशेष

Anagar Tehsil : अनगर तहसील कार्यालयावर टांगती तलवार, शासन निर्णयाची प्रतीक्षा

Rural Administration : अनगर अपर तहसील कार्यालय सुरू होऊन पूर्ण क्षमतेने कामकाज होण्यापूर्वीच न्यायालयाच्या निकालामुळे ते बंद करण्याची वेळ आली आहे.

Team Agrowon

Solapur News : अनगर अपर तहसील कार्यालय सुरू होऊन पूर्ण क्षमतेने कामकाज होण्यापूर्वीच न्यायालयाच्या निकालामुळे ते बंद करण्याची वेळ आली आहे. या कार्यालयाला आता शासनाचे पुढील आदेश काय येतात, याची प्रतीक्षा लागली आहे.

२४ जुलै २०२४ चा शासनाचा आदेश उच्च न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी रद्द केला आहे. यामुळे शासनाच्या पुढील आदेशानुसार या कार्यालयाचा निर्णय होणार आहे.

मोहोळ तालुक्यातील नरखेड, अनगर, शेटफळ व पेनूर या चार महसूल मंडळासाठी २४ जुलै २०२४च्या शासन आदेशानुसार स्वतंत्र अपर तहसील कार्यालय अनगर येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यानुसार १५ ऑगस्ट २०२४ ला या अत्यंत साधेपणाने प्रगतशील शेतकरी दादासाहेब बोडके यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले होते. जेमतेम सहा महिनेदेखील या कार्यातून कारभार झाला नाही.

तोपर्यंतच हा अध्यादेश रद्द करण्याचा उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. यामुळे शासनाकडून काय आदेश येतो? याकडे महसूल प्रशासनाचे लक्ष लागले आहे. त्यानुसार पुढील निर्णय होणार आहे.

२४ जुलैचा आदेश न्यायालयाने रद्द ठरविला आहे. अद्याप ऑनलाइनसाठी तर स्वतंत्र अनगर डेस्क तयार करण्यात आलेला नव्हता. अजूनही या गावांचे दप्तर स्वतंत्र करण्यात आलेले नव्हते. फक्त दैनंदिन कामकाज सुरू होते. संपूर्ण अभिलेख मोहोळ येथेच आहे. यामुळे शासनाचे पुढील आदेश काय येतात, याची आम्हाला प्रतीक्षा आहे.
- मनिषा कुंभार, निवासी जिल्हाधिकारी, सोलापूर
अनगर अपरसाठी स्वतंत्र पदे निर्माण करण्यात आलेली नव्हती. मोहोळ तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे तो अतिरिक्त पदभार देण्यात आलेला होता. यामुळे शासनाला मार्गदर्शन मागवून त्याप्रमाणे यापुढील निर्णय होतील.
- सचिन मुळीक, तहसीलदार मोहोळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT