Seed Selling Agrowon
ॲग्रो विशेष

Unauthorized seed stock : तळोधी येथे १८ लाखांचा अनधिकृत बियाणे साठा जप्त

Agriculture Department Bharari Pathak : कृषी विभागाच्या भरारी पथकाने तळोधीत एका पीकअपमधून ७५९ किलो अनधिकृत बियाणे साठा जप्त केला.

Team Agrowon

Chandrapur News : कृषी विभागाच्या भरारी पथकाने तळोधीत एका पीकअपमधून ७५९ किलो अनधिकृत बियाणे साठा जप्त केला.

जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांची किमत १८ लाख ९७ हजार रुपये आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी भरारी पथकाला दम दिल्यानंतर कारवाईला वेग आला असून, या महिन्यातील ही तिसरी कारवाई आहे.

नागपूर-चंद्रपूर मार्गावर असलेल्या तळोधी येथे एका वाहनातून एचटीबीटी बियाण्यांचा साठा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी या मार्गावर नाकाबंदी केली.

नागभीडकडून सिंदेवाहीकडे जात असलेल्या एमएच ३३ टी २०७१ या क्रमांकाच्या पीकअपवर पोलिसांना संशय आला. त्यांनी हे वाहन अडवून तपासणी केली असता त्यात अनधिकृत बियाण्यांचे १५ पोते आढळून आले.

७५९ किलो असलेल्या बियाण्यांची किमत १८ लाख ९७ हजार रुपये आहे. पोलिसांनी हा साठा जप्त करून कृषी विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच भरारी पथक दाखल झाले. या प्रकरणी प्रकाश शिवदास वन्नेवार, रेणुका बाबू यादलापल्ली यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

तेलंगणा सीमेला लागून असलेल्या गोंडपिंपरी तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर बीटी तस्कर सक्रिय झाले आहेत. अनेक ठिकाणी अनधिकृत बीटीची विक्री सुरू आहे. याच माहितीच्या आधारे कृषी विभागाचे भरारी पथक दोन दिवसांपासून गोंडपिंपरी तळ ठोकून होते. त्यांनी हिवरा, सकमूर, भंगाराम तळोधी, धाबा येथे अनेकांच्या घरांची झाडाझडती घेतली.

धाबा येथे तेलंगणातील कोटेश्वरराव चिलकुरी हा किरायाने राहत होता. त्याच्या घरी चोरीचा बीटीचा साठा असल्याची माहिती मिळताच भरारी पथक धाब्यात पोहोचले. त्यांनी घराची तपासणी केली. त्याच्या घरातही बीटीचा साठा आढळून आला. त्याची किंमत ४२ हजार रुपये आहे.

झाडाझडतीनंतर कारवाई

खरीप हंगामातील ही तिसरी कारवाई आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी काही दिवसांपूर्वीच भरारी पथकाची बैठक घेतली. हंगामात केवळ एकच कारवाई केल्यावरून त्यांनी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. त्यानंतर भरारी पथक सक्रिय झाले.

दोन दिवसांत मोठा साठा पथकाने जप्त केला. ही कारवाई विभागीय कृषी संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांच्या मार्गदर्शनात कृषी विकास अधिकारी राजपूत, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक बोढे, मोहीम अधिकारी कटरे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT