Illegal Seed Seized Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Seed Seized : अवैध बियाण्यांसह अडीच लाखांचा माल जप्त

Bogus Seed : कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघोरी चौक रहिवासी संजय दद्दूजी भालेकर हे सालई गोधनी परिसरात अनधिकृत बियाण्यांची विक्री करीत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती.

Team Agrowon

Nagpur News : वाहनातून अनधिकृत बियाण्यांची विक्री करणाऱ्या एका व्यक्‍तीविरोधात कारवाई करीत १०० पाकिटे बियाणे व वाहन असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कृषी विभागाच्या पथकाने कुही पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली.

कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघोरी चौक रहिवासी संजय दद्दूजी भालेकर हे सालई गोधनी परिसरात अनधिकृत बियाण्यांची विक्री करीत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती.

त्याआधारे विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, मुख्य गुणनियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिदूरकर यांच्या मार्गदर्शनात गुण नियंत्रण निरीक्षक चंद्रशेखर कोल्हे, संदीप पवार, रवींद्र राठोड, कृषी अधिकारी पंकज लोखंडे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक मार्कंड खंडाईत यांच्या पथकाने कारवाई केली.

त्याकरिता बनावट ग्राहक बियाणे खरेदीसाठी संजय भालेकर यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यांनी बियाणे विक्रीचा प्रयत्न करताच पोलीस व कृषी विभागाच्या पथकाने संजय भालेकर यांना पकडले.

या कारवाईत अनधिकृत बियाण्यांची १०० पाकिटे त्याबरोबरच चारचाकी वाहन असा २ लाख ८५ हजार १०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कुही पोलिसांत गुन्हा दाखल केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yeramala Yatra: येडेश्वरी देवीच्या जयघोषाने दुमदुमली येरमाळानगरी

Satara Agriculture Loss: सातारा जिल्ह्यात गारपीट,वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान

Hapus Mango Prices: आवक वाढताच हापूसचे दर गडगडले

Electoral Roll Revision: कळंब तालुक्यात मतदार याद्यांचे पुनरीक्षण वेगात

Pre Monsoon Rain: नेवासा, पाथर्डी तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT