Lift Irrigation Project Agrowon
ॲग्रो विशेष

Lift Irrigation Project : देगाव उपसा योजनेतून ५५ हजार एकराला उजनीचे पाणी

Agriculture Irrigation : देगाव जलसेतूचे काम पूर्ण झाल्यानंतर आता देगाव उपसा सिंचन योजनेतून दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील ५५ हजार एकराला उजनी धरणाचे पाणी मिळणार आहे.

Team Agrowon

Solapur News : देगाव जलसेतूचे काम पूर्ण झाल्यानंतर आता देगाव उपसा सिंचन योजनेतून दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील ५५ हजार एकराला उजनी धरणाचे पाणी मिळणार आहे. मार्चमध्ये उजनीतून शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर देगाव योजनेचे (२८ किमी) दुसऱ्यांदा ट्रायल होणार आहे.

सुरवातीला बाराशे हेक्टरला पाणी मिळेल. पंपहाऊसचे व बंदिस्त नलिकांचे काम पूर्ण झाल्यावर दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची देगाव उपसा सिंचन योजना आता पूर्णत्वाकडे जात आहे.

देगाव परिसरातील रेल्वे रुळावरील जलसेतूचे काम १४ वर्षांनंतर आता पूर्ण झाले आहे. सध्या देगाव शाखा कालव्याचे २८ किलोमीटर काम पूर्ण झाले असून तेथून पुढे होटगीच्या हद्दीत मोठे पंपहाऊस बांधले जात आहे.

त्याठिकाणी पाणी आणून तेथून पुढे पाणी नेण्यासाठी बंकलगी व आहेरवाडीच्या शिवारापर्यंत बंदिस्त नलिका टाकण्यात आली आहे. ते पाणी बंकलगी-आहेरवाडीच्या हद्दीतील वितरण कुंडात आणले जाईल, त्याचेही काम सुरु आहे. वितरण कुंडावरुन पुढे सुमारे साडेदहा किमीच्या दोन बंदिस्त नलिकांद्वारे पाणी नेले जाणार आहे.

ठिकठिकाणी कनेक्शन

देगाव योजनेच्या कामाची मुदत मार्च २०२६ पर्यंत आहे, पण डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल, असा विश्वास अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी व्यक्त केला आहे. पाच हजार व दहा हजार हेक्टर जमिनीला सहजपणे पाणी मिळेल, अशा दोन बंदिस्त नलिका देखील टाकल्या जात आहेत. त्या नलिकेला काही ठरावीक अंतरावर आऊटलेट (नळ कनेक्शन) सोडण्यात येणार असून त्याद्वारे एकूण २२ हजार हेक्टरला पाणी मिळणार आहे.

एकरुख योजना आता कार्यान्वित झाली असून देगाव उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याचे प्रात्यक्षिक देखील झाले आहे. आता होटगी हद्दीतील पंप हाऊसचे काम गतीने सुरु असून पुढच्या वर्षात या योजनेतून दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना उजनी धरणाचे पाणी मिळणार आहे.
- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Cycle Process: जलशास्त्र : पाण्याच्या प्रवासाचे विज्ञान

Soil Health Management: जमीन सुपोषण ही काळाची गरज : डॉ. इंद्र मणी

Farming Tips: कोरडवाहू शेतात दीर्घकाळ ओलावा टिकवण्यासाठी विविध पद्धती

Youth Congress Protest: मुदखेडमध्ये युवक काँग्रेसचा गाढव मोर्चा

Farm Loan Waiver: ३२ लाख शेतकऱ्यांची फसवणूक, त्यांची ५० हजारांवर बोळवणूक, कर्जमाफीवरून अजित नवलेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT