Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Typist Exam: ‘कृषी’तील गट-क संवर्गाच्या लघू टंकलेखक पदांसाठी चाचणी

Agriculture Department Jobs: राज्यात २०२३ मध्ये झालेल्या लघू टंकलेखक परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी एक व दोन फेब्रुवारीला घेतली जाणार आहे.

Team Agrowon

Akola News: राज्यात २०२३ मध्ये झालेल्या लघू टंकलेखक परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी एक व दोन फेब्रुवारीला घेतली जाणार आहे. राज्यात आठ विभागांतील केंद्रांवर ही चाचणी परीक्षा एकाचवेळी होऊ घातली आहे. एकूण ६० पदांसाठी ३३४६ उमेदवारांची व्यावसायिक चाचणी होणार आहे.

कृषी विभागात कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त आस्थापनेवरील लघू टंकलेखक, लघू लेखक (निम्न श्रेणी), लघू लेखक (उच्च श्रेणी) या पदांकरिता ६ एप्रिल, २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती.

या जाहिरातीस अनुसरून पदांची ऑनलाइन परीक्षा ‘क’ २१ सप्टेंबर २०२३ रोजी झाली होती. परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निकालानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेतली जात आहे. राज्यात आठ विभागांत नऊ केंद्रांवर व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे.

या चाचणी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्यांना प्रवेशपत्रे पाठविण्यात आली आहेत. ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र मिळाले नसेल त्यांनी संबंधित विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामधून मंगळवारी (ता. २८) किंवा बुधवारी (ता. २९) प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Scheme: मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेच्या कामात भ्रष्टाचार? चौकशी होणार

Fish Farming: मत्स्यपालनामध्ये व्यावसायिक संधी...

Cotton Cultivation Tips: कपाशी लागवडीची पंचसूत्री

Soybean Milk Benefits: सोयाबीन दूध नवजात करडांसाठी फायदेशीर

Cattle Feed Price: दुग्धव्यवसाय तोट्यात; पशुखाद्याच्या दरात वाढ झाली आहे का? पशुसंवर्धनमंत्र्यांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT