Over two and a half thousand in six years Farmer ineligible for suicide 
ॲग्रो विशेष

Farmer Issue : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी बीड येथे मार्चमध्ये दोन दिवसीय अधिवेशन

Farmers Convention : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना मानसिक, सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय, शैक्षणिक आधार देण्यासाठी तसेच त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा व आत्मसन्मानाचा ठोस कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी २२ व २३ मार्च रोजी दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Team Agrowon

Beed News : बीड : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना मानसिक, सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय, शैक्षणिक आधार देण्यासाठी तसेच त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा व आत्मसन्मानाचा ठोस कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी २२ व २३ मार्च रोजी दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय रविवारी (ता. २) बीड येथील शासकीय विश्रामगृहात यासंदर्भात झालेल्या शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला, तशी माहिती क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे यांनी दिली.

जिल्ह्यात १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत म्हणजे १० वर्षांत २४३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. राज्य सरकारने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना केवळ १ लक्ष रुपयांची तुटपुंजी मदत दिली आहे. पीडित कुटुंबांचे आजारपण त्यावरील अवाढव्य औषध उपचार खर्च, मुलांचे शिक्षण, सण-उत्सव दैनंदिन मूलभूत प्रापंचिक गरजा आदी अनेक सांसारिक गोष्टी अर्धवटच आहेत. पूर्ण शिक्षण नसल्याने पीडित कुटुंबातील युवक, युवती बेरोजगार आहेत.

त्यांचे विवाह होत नाहीत. त्यांच्या करिअरसंबंधी कोणालाच सोयरे-सुतक नाही. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना मानसिक, सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय, शैक्षणिक आधार देण्यासाठी तसेच त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसनाचा व आत्मसन्मानाचा ठोस कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी हे अधिवेशन घेण्यात येणार आहे.

या अधिवेशनासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशातील शेती विषयातील तज्ज्ञ मान्यवर, शेतकरी चळवळीतील नेते, कृषी विद्यापीठातील कुलगुरू यांना निमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले. अधिवेशनात राज्यात घडलेल्या संपूर्ण  शेतकरी आत्महत्यांची श्वेतपत्रिका प्रकाशित करून शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात येणार असल्याचे करपे यांनी सांगितले.

या बैठकीला शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, कुलदीप करपे, कृषिभूषण शिवराम घोडके, ‘आप’चे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे, पत्रकार अविनाश वाघिरकर, बी. डी. लोणकर, ॲड. योगेश शेळके, ॲड. गणेश मस्के, रामनाथ खोड, रामेश्वर गाडे, सामाजिक कार्यकर्त्या आयेशा शेख, संध्या भोसले, नयना भाकरे, आनंद ढाकणे, पत्रकार दत्ता आजबे, दादासाहेब वाघमारे, लहू गायकवाड, रघुनाथ नावडे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

SCROLL FOR NEXT