Water Project Agrowon
ॲग्रो विशेष

Water Projects : धाराशिवमधील अठ्ठावीस प्रकल्प १०० टक्के भरले

Water Stock : गेल्या दोन महिन्यांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २२६ पैकी २८ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.

Team Agrowon

Dharashiv News : गेल्या दोन महिन्यांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २२६ पैकी २८ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यामध्ये एका मध्यम आणि २७ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. पावसाळ्याचे दोन महिने पूर्ण झाले, तरी अद्याप चार लघू प्रकल्प कोरडेठाक आहेत.

पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला असून, जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. जिल्ह्यात एक मोठा, १७ मध्यम व २०६ लघू प्रकल्प आहेत. सध्या या सर्व प्रकल्पांमध्ये केवळ २३.८६ टक्केच पाणीसाठा आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या सर्व प्रकल्पांत फक्त चार टक्केच पाणीसाठा होता. गेल्या दोन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात १९ टक्क्यांनी वाढ होऊन तो आता २३.८६ टक्के झाला आहे.

जून महिन्यात जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये दमदार पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पांतील पाणीपातळीत वाढ होण्यास या पावसाची मदत झाली. जुलैमध्ये मात्र कधी मध्यम स्वरूपाचा, तर बहुतांशवेळा हलका व रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पांतील पाणीपातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही. पावसाळ्याच्या उर्वरित दिवसांमध्ये हे सर्व प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या व दमदार पावसाची गरज आहे. दरम्यान, रायगव्हाण, खासापर, खंडेश्‍वर, साकत, हरणी, खंडाळा या सहाही मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा अद्यापही शून्य टक्केच आहे.

१२ प्रकल्पांत ७५ टक्के साठा

दोन महिन्यांत झालेल्या पावसामुळे एक मध्यम व २७ लघू प्रकल्प मिळून २८ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामध्ये भूम तालुक्यातील संगमेश्‍वर हा एकमेव मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. एक मध्यम व ११ लघू मिळून १२ प्रकल्पांमध्ये सध्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. एक मध्यम व १४ लघू प्रकल्पांत ५१ टक्क्यांपेक्षा अधिक, दोन मध्यम व २५ लघू प्रकल्पांत २६ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.

चार लघू प्रकल्प कोरडे

सहा मध्यम व ७२ लघू प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. एक मोठा, सहा मध्यम व ५६ लघू प्रकल्पांतील साठा ज्योत्याखाली आहे. शिवाय चार लघू प्रकल्प कोरडेच आहेत. या प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा होण्यासाठी आगामी काळात मोठ्या पावसाची गरज आहे. तेरणा, रुईभर, बोरी (कुरनूर), बेन्नीतुरा आदी मध्यम प्रकल्पांतून परिसरातील शहरे व गावांना पाणीपुरवठा केला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT