Jayakwadi Dam : जायकवाडीत पाणीसाठा २५.२८ टक्क्यांवर

Jayakwadi Water Stock : सुमारे १०२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा गुरुवारी (ता. ८) दुपारी १२ वाजता २५.२८ टक्क्यांवर पोहोचला होता.
Jayakwadi Dam
Jayakwadi DamAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : सुमारे १०२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा गुरुवारी (ता. ८) दुपारी १२ वाजता २५.२८ टक्क्यांवर पोहोचला होता. दुसरीकडे गोदावरी पात्रातून जायकवाडीत येणाऱ्या पाण्याच्या आवकेमध्ये मात्र प्रचंड घट झाली आहे.

मराठवाड्यातील सिंचन किंवा पाणीपुरवठा योजनेसाठी जायकवाडीतील पाणीसाठा अत्यंत महत्त्वाचा आहे. नगर, नाशिककडील वरच्या भागातून गोदावरी पात्रात जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे ३० जुलै रोजी सायंकाळनंतर जायकवाडी प्रकल्पात येणाऱ्या पाण्याच्या आवकेत वाढ होणे सुरू झाले.

Jayakwadi Dam
Dimbhe Dam Water : डिंभे धरणातून चार दिवसांत २.८७ टीएमसी पाण्याचा विसर्ग

५ ऑगस्टला सकाळी ६ वाजता २४ हजार ६०७ क्युसेकने सुरू असलेली आवक १० वाजता ४२ हजार ३३१ क्युसेकवर पोहोचली होती. दुपारी १२ वाजता मात्र आवकेमध्ये किंचित घट होऊन ती ३९ हजार २२ क्युसेकने सुरू होती. त्या वेळी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा १४.२६ टक्क्यांवर पोहोचला होता.

त्याच दिवशी दुपारी २ वाजता ही आवक वाढून ६६,३६७ क्युसेकवर पोहोचली. त्यामुळे रात्री १० वाजता ६६ हजार ३६७ आवक सुरू होती. त्या वेळी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा १७.१८ टक्क्यांवर पोहोचला होता. ६ ऑगस्टला सकाळी ६ वाजता आवक घटून ५८,५३५ क्युसेकवर आली. सकाळी १० वाजता पुन्हा आवक वाढून ६६,३६७ क्युसेकवर गेली. दुपारी १२ वाजता ५७,३१७ क्युसेक, दुपारी दोन वाजता ४८,२६८ क्युसेकने आवक सुरू होती.

Jayakwadi Dam
Jayakwadi Dam : नाशिकमध्ये पावसाची संततधार; जायकवाडीत पाण्याची आवक वाढली, चिंता मात्र कायम 

त्या वेळी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा २१.८१ टक्क्यांवर आला होता. ६ ऑगस्टला रात्री १० वाजता ३७ हजार ८९५ आवक सुरू होती. त्या वेळी प्रकल्पातील उपायुक्त पाणीसाठा २३.३० टक्क्यांवर आला होता. ७ ऑगस्टला सकाळी ६ वाजता ३७ हजार ८९५ क्युसेकने सुरू असलेली आवक सकाळी १० वाजता १३५७४ क्युसेकपर्यंत खाली आली. दुपारी २ वाजता पुन्हा आवक घटून ९०४९ क्युसेकवर आली.

त्या वेळी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा २४.३५ टक्क्यांवर होता. सायंकाळी ६ वाजता ही आवक १९ हजार ६०९ क्युसेकपर्यंत वाढून प्रकल्पातील उपयुक्त साठा २४.७२ टक्क्यांवर गेला होता. गुरुवारी सकाळी ६ वाजता आवक पुन्हा घटून १०३०२ क्युसेकवर आली. दुपारी १२ वाजता पुन्हा आवकेमध्ये घट होऊन ८०४४ क्युसेकने सुरू होती.

प्रकल्पात एकूण ४५ टीएमसी पाणी

एकूण १०२.७२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या जायकवाडीची ७६.६५ टीएमसी उपयुक्त पाण्याची क्षमता आहे. गत काही दिवसांत पाण्याच्या झालेल्या आवकेमुळे प्रकल्पात एकूण ४५.४५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यापैकी जवळपास १९.३८ टीएमसी हा उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती प्रकल्प प्रशासनाने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com