Rahibai Popere Agrowon
ॲग्रो विशेष

Rahibai Popere : सेंद्रिय शेतीकडे वळा : राहीबाई पोपेरे

पैसे देऊन विष विकत घेऊन आजाराला बळी पडण्यापेक्षा सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, नैसर्गिक शेती केली पाहिजे.

Team Agrowon

Ratnagiri News : पैसे देऊन विष विकत घेऊन आजाराला बळी पडण्यापेक्षा सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, नैसर्गिक शेती (Organic Farming) केली पाहिजे, असे प्रतिपादन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.

ॲग्रो व्हिजन कोकण, कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आयोजित पहिले कोकण प्रांत संमेलन दापोली येथे विश्‍वेश्‍वरय्या सभागृहात झाले.

या कार्यक्रमाचे उद्‍घाटन पद्मश्री राहीबाई पोपेरे, कुलगुरू डॉ. संजय सावंत, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य विनायक काशीद, अधिष्ठाता डॉ. बी. जी. देसाई, डॉ. पी. ए. सावंत, डॉ. संजय भावे, चंदन पाटील, अमोल शिंदे, प्रथमेश रासकर, डॉ. प्रशांत बोडके, डॉ. अमित देवगिरीकर, प्रथमेश दिघे, अक्षय जंगम या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत बोडके यांनी केले, तर परिचय प्रथमेश रासकर, अमोल शिंदे यांनी केला. या वेळी कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोसेसिंग, मार्केटिंग व उद्योजकतेसाठी नवकल्पना डॉ. नितीन पाटील यांनी दिल्या.

चंदन पाटील यांनी सामाजिक उद्योजकता या विषयाची मांडणी करून विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक कर्तव्याची जाणीव करून दिली. या संमेलनात आभासी पद्धतीने अमेरिकेतून डॉ. हर्ष किकेरे यांनी रोबोटिक आणि आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध उद्योजकतेवरील नवीन कल्पना मांडल्या. तसेच या वेळी पोस्टर स्पर्धा व रेसिपी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये एकूण २२ स्पर्धकांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमासाठी राज्यभरातून एकूण ३४० विद्यार्थी, १६ प्राध्यापक व ३४ शेतकरी महिला सहभागी झाले होते. डॉ. अमित देवगिरीकर यांनी आभार प्रदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: टोमॅटो दरात सुधारणा; सिताफळाला चांगला भाव, गवार तेजीत तर हळद-केळी दर स्थिर

Monsoon Rain: राज्यात पाऊस कमी होणार; मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार

Solar Project Nashik : दिवसा वीज देण्यासाठी सौरप्रकल्प पूर्ण करा

Livestock Market : बुलडाणा जिल्ह्यात जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार

Day-Time Electricity : अकोलेकाटी परिसरात दिवसा वीजपुरवठा

SCROLL FOR NEXT