Sericulture Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture Farming : श्रमातून श्रीमंत करणाऱ्या रेशीम शेतीकडे वळा

Mahendra Dhawale : श्रमातून श्रीमंत करणाऱ्या रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी केले.

Team Agrowon

Nanded News : कमी खर्चात शाश्वत उत्पादनाची हमी देणारे पीक म्हणून तुती लागवडीकडे पाहिले जाते. कमी-अधिक पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनाही या पिकाचे उत्पादन घेता येते. यामुळे श्रमातून श्रीमंत करणाऱ्या रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी केले.

बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे नावीन्यपूर्ण पद्धतीने रेशीम शेती करणाऱ्या विनोद पेंटे यांच्या प्रक्षेत्रावर श्री ढवळे यांनी शुक्रवारी (ता. २६) भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी रेशीम विकास अधिकारी नरसिंग बावगे, क्षेत्र सहायक श्री भंडारे, तांत्रिक सहायक अभय कुलकर्णी, श्री कोरके, हणमंत शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. श्री ढवळे म्हणाले, मराठवाड्यात तुती लागवडीला मोठा वाव आहे.

कमी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे वळण्याची उत्तम संधी आहे. मराठवाडा भागातील वातावरणही तुती लागवडीसाठी पोषक आहे. याच भागातील बीड, जालना व पूर्णा येथे कोष विक्रीसाठी बाजार उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना कोष विक्रीसाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही. शासनाकडून तुती उत्पादकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

यात तुती लागवड, शेड उभारणी यासाठी शासन अनुदान देते. तुती लागवडीसोबतच शेतकऱ्यांनी बालकीटक संगोपणगृह (चॉकी सेंटर)उभारण्याचे काम करावे. यासाठी शासन अनुदान उपलब्ध करुन देते. आगामी काळात एक हजार एकरावर चार चाकी सेंटर देण्याचा विचार आहे. चाकी सेंटरपासून उत्पादन वाढविणाऱ्या शेतकऱ्यांनाही उत्पादन चांगले मिळले, असे ते म्हणाले.

आदमपूर येथील शेतकरी विनोद पेंटे यांनी तुतीची लागवड दहा फूट बाय आठ फूट अंतरावर वृक्ष लागवड नावीन्यपूर्ण पद्धतीने केली आहे. यासोबतच कीटक संगोपणगृहातही तुतीचा पाला टाकण्यासाठी ट्रॅक पद्धत विकसित केली आहे. यापध्दतीची महेंद्र देशमुख यांनी पाहणी करुन आगामी काळात शासनाकडून ही पद्धत स्वीकारण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. यानंतर महेंद्र ढवळे, नरसिंग बावगे यांनी जोमेगाव (ता. लोहा) येथील शेतकरी दाजीराव दिगंबर शिंदे यांच्या तुती तसेच कीटकसंगोपण गृहाची पाहणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT