Turmeric Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Farming : मंगरूळ येथे हळद उत्पादन वाढ तंत्र प्रात्यक्षिक प्रक्षेत्र दिन

Turmeric Production : मंगरुळ येथील प्रगतशील शेतकरी अशोक देशमाने यांनी या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या वर्षी त्यांना एकरी ४० क्विंटल हळदीचे उत्पादन येईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

Team Agrowon

Parbhani News : परभणी कृषी विज्ञान केंद्रातर्फे मंगरुळ (ता. मानवत) येथे मंगळवारी (ता. १५) हळद उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर प्रात्यक्षिक प्रक्षेत्र दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनात कृषी विज्ञान केंद्र मार्फत तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्याच्या दृष्टीने हळद पिकातील उत्पादन वाढीसाठी भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत केरळ मधील कालिकत येथील मसाला वर्गीय संशोधन केंद्रामार्फत तयार करण्यात आलेले सूक्ष्म मुलद्रव्याचा वापर याबाबतचे आद्यरेषा पीक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आले.

या आद्यरेषा पीक प्रात्यक्षिकामध्ये मसाला वर्गीय संशोधन केंद्रामार्फत तयार करण्यात आलेले सूक्ष्म मुलद्रव्याचा हळदीच्या लागवडीनंतर ६० व ९० दिवसांनी वापर करण्यात आला. यामुळे वाढ चांगल्या प्रकारे होऊन पिकाचा पिवळेपणा कमी झाला.

यावेळी निविष्ठांचा प्रत्यक्षात वापर केलेल्या शेतकऱ्यांनी हळद उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होईल सांगितले. मंगरुळ येथील प्रगतशील शेतकरी अशोक देशमाने यांनी या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या वर्षी त्यांना एकरी ४० क्विंटल हळदीचे उत्पादन येईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

तांत्रिक सत्रामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अमित तुपे यांनी या तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद केले. शेतकऱ्यांनी या सूक्ष्म मुलद्रव्याचा आले व हळद या दोनही पिकात वापर करावा असे आवाहन केले.पुढील वर्षीच्या हंगामामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market: कांद्याला समांतर बाजारभाव योजना लागू करण्याची मागणी

Cotton Farmers Seminar: कापूस संशोधन विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी पीक परिसंवाद

Israel Iran conflict: इस्रायलचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला; इराणमध्ये आणीबाणी, मध्यपूर्वेतील तणाव तीव्र

Washim Development: समन्वय, नियोजनातून प्रगती

Ayushman Bharat Yojana: रुग्णालयांत उपचारांचे दरपत्रक लावावे लागणार

SCROLL FOR NEXT