Tur crop 
ॲग्रो विशेष

Tur Crop : तुरीच्या उत्पादनासाठी सुरुवातीपासून काळजी गरजेची : कुलदीप देशमुख

Farmer Training : अकोला जिल्ह्यातील मौजे खामखेड येथे या खरीप हंगामात लागवड होत असलेल्या तुरीच्या पिकाबाबत ‘आत्मा’तर्फे मार्गदर्शन करण्यात आले.

Team Agrowon

Akola News : तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी ३५ ते ४५ व्या दिवशी शेंडा खुडणी करणे महत्त्वाचे आहे. तूर पिकांमध्ये वेळीच शेंडे छाटल्यामुळे फांद्यांच्या संख्येत वाढ होऊन फांद्यावर फूल आणि शेंगाच्या संख्येत मोठी वाढ होते. सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरही तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ कुलदीप देशमुख यांनी केले.

बाळापूर तालुक्यातील खामखेड येथे आत्मा व कृषी विभागामार्फत खरीप तूर पिकाची शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, प्रकल्प उपसंचालक मिलिंद जंजाळ, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिला होता. सरपंच ज्योत्स्नाताई हागे, तालुका तंत्र अधिकारी विजय शेगोकार, पोकरा प्रकल्पाचे समन्वयक गोपाल बोंडे, कृषी पर्यवेक्षक रवींद्र भोजने, कृषी सहाय्यक गोपाल राऊत उपस्थित होते.

शेतीशाळा यशस्वी होण्यासाठी कृषिमित्र सुरेश इंगळे, पोलिस पाटील संतोषराव हागे, उद्धवराव हागे, संतोष साबळे, गोपाल शेगोकार आदी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Digital Agriculture Policy: डिजिटल सुसूत्रीकरणाचे स्वागतच!

Drought Relief: आंबेगावातील बाधित शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार : दिलीप वळसे पाटील

Chana Variety: परभणी चना-१७ वाणाची पूर्व मध्य विभागासाठी शिफारस

Onion Market Update: खरीप लाल कांद्याच्या आवकेत ७५ टक्के घट

Agricoss Day: डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २७ डिसेंबरला राज्य अॅग्रीकॉस दिन

SCROLL FOR NEXT