Tur Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Productivity : तूर उत्पादकता चार ते पाच क्विंटल

Tur Production : यंदाच्या हंगामात लागवड असलेल्या तुरीच्या काही क्षेत्रात काढणीला प्रारंभ झाला आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Akola News : अकोला ः यंदाच्या हंगामात लागवड असलेल्या तुरीच्या काही क्षेत्रात काढणीला प्रारंभ झाला आहे. प्रामुख्याने जूनच्या सुरुवातीला लागवड असलेल्या भागातील पिकाची काढणी झाली असून कुठे एकरी दोन क्विंटल, तर कुठे चार ते पाच क्विंटलपर्यंत सुद्धा उतारा आहे. मात्र, मध्यंतरी पडलेले धुके, वाळलेल्या पिकामुळे तुरीचे सरासरी उत्पादन यंदा तुलनेने कमी आहे. शिवाय मजुरांचीही टंचाई जाणवत आहे.

यावर्षात कमी प्रमाणात पाऊस झाला. त्याचा खरिपातील सर्वच पिकांवर झाला. याचा परिणाम तूर उत्पादनावरही झाला. अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. या जिल्ह्यामध्ये यंदा असमतोल हवामानाचा सर्वाधिक फटका बसला.

आधी मूग, उडीद हातातून गेले. त्यानंतर सोयाबीनचे पीकही बरेच कमी आले. आता तुरीच्या पिकाची काढणी सुरू झालेली आहे. तुरीची उत्पादकता एकरी क्विंटलपासून होत आहे. तुरीचे पीक सुरवातीच्या टप्प्यात चांगले होते.

पिकाची वाढही चांगली झाली. नंतर तूर फुलोऱ्यात असल्यापासून संकटे वाढू लागली. अनेक शेतातील तुरीची झाडे उधळली होती. शेंगा लागलेल्या असतानाही झाडे उभी वाळली. बऱ्याच शेतांमध्ये हे नुकसान ५० टक्क्यांपर्यंत होते. शिल्लक राहलेल्या तुरीची मळणी सुरू झाली.

तूर सोंगणीसाठी मजुरीचा दर एकरी २ ते ३ हजार रुपये मागितला जात आहे. उत्पादन कमी असतानाही दर अधिक झाल्याने बरेच शेतकरी हार्वेस्टरचा पर्याय अवलंबत आहेत. यंत्राने तूर काढणी केल्यामुळे जनावरांसाठी मिळणारे कुटार आता जमिनीतच गाळले जात आहे.

दरही ८००० पर्यंत
मध्यंतरी तुरीचा दरा १० हजारांवर पोचलेला होता. पिकाची काढणी जसजशी वाढू लागली तसा तुरीचा दर आता सरासरी ८ हजारांपर्यंत आलेला आहे. गेल्या काही दिवसांत दोन हजारांनी तुरीचा दर घसरलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT