Paddy Crop : भात पीक आले फुलोऱ्यात

Paddy Farming : हिर्डोशी भागात (ता. भोर) भात पीक फुलोऱ्यात असून, लोंब्या लगडल्या आहेत. पुढील काही दिवसात भात पक्व होऊन भात पिके काढणी योग्य होणार आहेत.
Paddy Crop
Paddy Crop Agrowon
Published on
Updated on

Pune News : हिर्डोशी भागात (ता. भोर) भात पीक फुलोऱ्यात असून, लोंब्या लगडल्या आहेत. पुढील काही दिवसात भात पक्व होऊन भात पिके काढणी योग्य होणार आहेत. खोऱ्यात भात हेच प्रमुख पीक आहे. यंदा जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिली. दुबार पेरणीचे संकट होते. परंतु जुलै महिन्यात झालेल्या पावसाच्या सुरुवातीने भात पीक लावणी योग्य झाली.

भात लावणीच्या काळातही पावसाच्या लहरीपणाने शेतकरी चिंतातूर होता. मात्र, तरीही भात लावण्या पूर्ण झाल्या. गणेशोत्सवाच्या काळात भात फुलावर‌ असताना जोरदार पाऊस झाला. त्यामुळे फुले झडून गेलेल्या पिकांचे उत्पादन घटणार आहे.

Paddy Crop
Paddy Crop : भात पिके निसवण्याच्या अवस्थेत

त्यातूनही उरलेल्या भात पिके फुलोऱ्यात असून भाताला‌ लोंब्या आल्या आहेत. अजून‌ काही ठिकाणी पीक हिरवेगार दिसत असली तरी काही ठिकाणी पिवळसर‌ पडू लागली आहेत. कर्णफुले पिवळी पडल्यानंतर भात पीक काढणीसाठी तयार होणार आहे.

Paddy Crop
Paddy Production : शिराळा तालुक्यात भात उत्पादन ४० टक्के घटण्याची शक्यता

रानटी प्राणी, पावसाचा लहरीपणा व करपा रोग यातून बचावलेली भात शेतीवर शेतकऱ्यांचे यंदाचे उत्पादन अवलंबून आहे.

दरम्यान, यंदा हंगामामध्ये कधी पावसाची दडी तर कधी मुसळधार असा लपंडाव सुरू होता. शेवटी कितीही केले तरी, काढणी होऊन भात घरात नेईपर्यंत शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com