Tur Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Cultivation : खानदेशात पूर्वहंगामी तूर जोमात; १५ हजार हेक्टरवर लागवड

Tur Sowing : खानदेशात तुरीचे क्षेत्र यंदा वाढले आहे. पूर्वहंगामी किंवा सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रात तूर पीक जोमात आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात तुरीचे क्षेत्र यंदा वाढले आहे. पूर्वहंगामी किंवा सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रात तूर पीक जोमात आहे. यंदा खानदेशात सुमारे १५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. तूर लागवड जळगाव जिल्ह्यात पाच ते सहा हजार हेक्टरवर केली जाते. मुक्ताईनगर, रावेर, जामनेर, बोदवड तालुक्यात लागवड अधिक असते.

उर्वरित भागात आंतरपीक म्हणून किंवा आपल्या कुटुंबापुरते उत्पादन काढण्यावर शेतकरी भर देतात. तुरीची व्यावसायिक शेती रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेरात आहे. तर धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर आणि नंदुरबारमधील तळोदा, नवापूर भागांत काही शेतकरी तूर लागवड करतात.

संकरित, संशोधित वाणांच्या लागवडीवर शेतकरी भर देतात. गेल्या वर्षी एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन हाती आले. अतिपावसात पिकाचे नुकसान झाले. पण दर टिकून होते. किमान पाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर काही शेतकऱ्यांनी मार्चमध्ये तुरीची विक्री करून सहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळविला.

दर सुरुवातीपासून टिकून होते. मुक्ताईनगर, रावेरात जलसाठे तापी नदीकाठी मुबलक आहेत. या भागात उत्तम व्यवस्थापन करून तुरीचे उत्पादन शेतकरी साध्य करतात. ठिबकवर लागवड केली जात आहे. एकरी नऊ क्विंटलचे उत्पादन या भागात काही शेतकरी घेतात. लागवड मे महिन्याच्या अखेरीस सुरू होते.

अनेक शेतकऱ्यांनी कोरडवाहू लागवडीचे नियोजन केले आहे. टिकून असलेले दर व उठाव यामुळे अनेक शेतकरी यंदा तूर लागवडीकडे वळले. जळगाव जिल्ह्यात ११ हजार हेक्टरवर तूर पीक आहे. पीकस्थिती चांगली आहे. त्यावर शेतकरी फवारणी घेत आहेत. तसेच या महिन्यातही पाऊस आल्याने कोरडवाहू क्षेत्रातील तुरीसही लाभ झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT