Matheran Traffic Agrowon
ॲग्रो विशेष

Matheran Traffic Issue : माथेरान होणार वाहतूक कोंडीतून मुक्त

Matheran Tourism : मागील काही वर्षांपासून माथेरानमध्ये पर्यटकांचा राबता दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र घाटमाथ्यावर योग्य अशी पार्किंगची सोय नसल्याने अनेकांची वाहने रस्‍त्‍यावर पार्क केली जातात.

Team Agrowon

Matheran News : पावसाळ्यात मुंबई-पुण्यातील पर्यटक माथेरानमध्ये मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्‍यामुळे घाटरस्‍त्‍यावर वाहतूक कोंडी होत आहे. अपुऱ्या वाहनतळ व्यवस्थेमुळे अनेक जण रस्‍त्‍यातच गाड्या पार्क करीत असल्याने मोठ्या प्रमाणात कोंडी होते. याचा परिणाम पर्यटन व्यवसायाला बसतो आहे.

त्‍यामुळे माथेरान वन व्यवस्थापन समिती, वन विभागाच्या पुढाकारातून वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याकरिता माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती, टॅक्सीचालक संघटना यांच्या उपस्थितीत माथेरान प्रवेशद्वारावर असलेल्या दस्तुरी नाका येथील वाहनतळाचा आढावा घेण्यात आला. यामुळे भविष्यात येथील वाहतूक कोंडी कायमची सुटण्यास मदत होणार आहे.

मागील काही वर्षांपासून माथेरानमध्ये पर्यटकांचा राबता दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र घाटमाथ्यावर योग्य अशी पार्किंगची सोय नसल्याने अनेकांची वाहने रस्‍त्‍यावर पार्क केली जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून त्‍याचा परिणाम पर्यटन व्‍यवसायावर होत आहे. त्‍यामुळे प्रशासनाकडून पार्किंगसाठी नियोजन आखण्यात येत आहे.

माल वाहतुकीसाठी उपयुक्‍त

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमटीडीसी मागील रेल्वे मार्गालगत असणारा रस्तादेखील पुनरुज्जीवित करून मालवाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्‍यामुळे माल वाहतुकीला येणारे अडथळे दूर होतील व घोड्यांवर लादलेल्या सामानापासून येथे येणाऱ्या वाहनांचे नुकसानदेखील थांबवण्याकरिता मदत होणार आहे.

शिवाय, शहरात माल वाहतुकीसाठी हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे. याप्रसंगी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीचे कुलदीप जाधव, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, चंद्रकांत जाधव, रत्नदीप प्रधान, सुनील शिंदे, संतोष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Urea Price Hike: युरिया दराचा भडका उडणार?

ZP Agriculture Department: झेडपी ‘कृषी’चा डोलारा फक्त ३०० अधिकाऱ्यांवर

Ethanol Supply: देशात इथेनॉल पुरवठा ४१७ कोटी लिटरवर

Women Empowerment: महिलांचा पंचायत ते संसद प्रवास सोपा होईल : मोदी

Agri Business Course: ॲग्रीबिझनेस पदवी अभ्यासक्रमाला मान्यता

SCROLL FOR NEXT