India Vs US Agrowon
ॲग्रो विशेष

US-China Trade War : व्यापारयुद्धाचा भारतावर केवळ ०.१ टक्का परिणाम

US Import Duty Policy : चीनमधून येणाऱ्या वस्तूंनाही यातून वगळले आहे. यामुळे चीनमधील कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या ‘ॲपल’, ‘सॅमसंग’सारख्या कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Team Agrowon

New Delhi News : अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्कामुळे सुरू झालेल्या व्यापारयुद्धाच्या भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नावर केवळ ०.१ टक्का परिणाम होईल, असा अंदाज ‘पीएचडी चेंबर्स ऑफ कॉमर्स’ने रविवारी (ता. १३) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची स्पर्धात्मकता आणि सरकारचे पाठबळ यावर विश्‍वास असल्याचे ‘पीएचडीसीसीआय’चे अध्यक्ष हेमंत जैन यांनी म्हटले आहे.

‘‘भारतात देशांतर्गत उत्पादनाची स्थिती मजबूत आहे. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि इतर काही अभियानांच्या माध्यमातून सरकारने उद्योगांना पाठबळ दिले आहे. उद्योगक्षेत्रातील भारताची स्पर्धात्मकता पाहता अमेरिकेच्या व्यापारयुद्धातही आपण समतोल राखू शकू आणि आयातशुल्कवाढीचा केवळ ०.१ टक्का परिणाम जाणवेल,’’ असा विश्‍वास जैन यांनी व्यक्त केला. सध्या जाणवणारा तोटाही लवकरच भरून काढला जाईल, असेही ते म्हणाले.

ट्रम्प प्रशासनाचे आणखी एक पाऊल मागे

चीन वगळता इतर देशांवर लादलेले आयात शुल्क १० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवणाऱ्या अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने आणखी एक पाऊल मागे घेताना मोबाइल फोन, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना ‘जशास तसे आयात शुल्क’ धोरणातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधून येणाऱ्या वस्तूंनाही यातून वगळले आहे. यामुळे चीनमधील कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या ‘ॲपल’, ‘सॅमसंग’सारख्या कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमेरिकेने स्मार्टफोन, सेमीकंडक्टर चिप, राऊटर, संगणक यासारख्या वीस इलेक्ट्रॉनिक वस्तूंना आयात शुल्कवाढीतून वगळले आहे. चीनवर अमेरिकेने १४५ टक्के आयात शुल्क लागू केल्याने स्मार्टफोन आणि इतर वस्तू अत्यंत महाग होतील, अशी भीती अमेरिकेतील नागरिकांना वाटत होती. त

सेच, चीनमधील कारखान्यांमध्ये उत्पादन घेणाऱ्या अमेरिकी कंपन्यांनीही चिंता व्यक्त केली होती. सरकारच्या नव्या निर्णयामुळे या कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र ही सूट अल्पकाळासाठी असू शकते, असेही सरकारने सूचित केले आहे. दरम्यान, चीन, अमेरिका व्यापारयुद्ध थांबण्याची चिन्हे नसल्याने चीनने अमेरिकेविरोधात जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार नोंदविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT