Sugarcane Price Protest agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Price Protest : कोल्हापुरात ऊस दराचे आंदोलन चिघळलं; ट्रॅक्टर-ट्रॉलीचे टायर फोडले

Sugarcane Price : दर जाहीर न करता ऊस तोडणी सुरू करण्याचा प्रकार हाणून पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे ऊसदराचे आंदोलन चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

sandeep Shirguppe

Sugarcane Price Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दरावरून आंदोलनाची ठिणगी पडली आहे. चिंचवाड (ता. शिरोळ) येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचे टायर 'आंदोलन अंकुश'च्या कार्यकर्त्यांनी फोडले. बुधवारी (ता. २७) मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. दर जाहीर न करता ऊस तोडणी सुरू करण्याचा प्रकार हाणून पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे ऊसदराचे आंदोलन चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

शिरोळ तालुक्यात ऊस दराचा तोडगा निघाल्याशिवाय उसाची तोड घेऊ नये यासाठी आंदोलन सुरू आहे. चिंचवाड (ता. शिरोळ) येथे हाळ भागात उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे टायर फोडण्याची घटना घडली. यामुळे शिरोळ तालुक्यात ऊस वाहतूकदारामध्ये खळबळ उडाली आहे.

हुपरी येथील कारखान्यासाठी चिंचवाड येथून ऊस भरून जाताना 'आंदोलन अंकुश'च्या कार्यकर्त्यांनी उसाच्या वाहनाचे टायर फोडले. ही घटना बुधवारी (ता.२७) रात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली. यात सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची फिर्याद रमेश जिंत्राप्पा खरोसे (रा. कुरुंदवाड) यांनी शिरोळ पोलिसांत दिली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेमध्ये गळीत हंगाम सन २३-२४ गळीत हंगामातील २०० रुपये अंतिम हप्ता व गळीत हंगाम २०२४-२५ च्या ३७०० रुपयाच्या प्रतिटन पहिल्या उचलीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत असून वरील मागणीबाबत साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची तातडीने बैठक घेऊन मार्ग काढण्यात यावा अन्यथा साखर कारखान्यांना तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल, असे निवेदन दिले आहे.

आंदोलकांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, गतवर्षीचा दुसरा हप्ता २०० रुपये व चालूची पहिली उचल ३७०० रुपये कारखान्यांनी जाहीर केल्याशिवाय कोणीही ऊस तोड स्वीकारू नये. संघटनांनी केलेल्या मागणीवर कारखान्यांनी तत्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न करून हंगाम सुरळीत होईल हे पहावे.

चालू गळीत हंगामामध्ये साखर कारखान्यांनी पहिल्या ५० दिवसांत कार्यक्षेत्रातीलच ऊस गाळप करावा. पुरामध्ये बाधित झालेल्या उसाची प्राधान्याने पहिल्यांदा तोड करण्यात यावी. आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करून दडपशाहीने हंगाम सुरु करण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT