Minister Tanaji Sawant Agrowon
ॲग्रो विशेष

Minister Tanaji Sawant : महाआरोग्य शिबिरासाठी सेवाभावाने कर्तव्य बजावावे

Ashadhi Wari : वारकरी सांप्रदायाचे आरोग्य जपण्याचे काम आषाढी वारी कालावधीत पंढरपूर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत आहे.

Team Agrowon

Solapur News : वारकरी सांप्रदायाचे आरोग्य जपण्याचे काम आषाढी वारी कालावधीत पंढरपूर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे शिबिरासाठी नियुक्त केलेल्या प्रत्येकानेच सर्वश्रेष्ठ सेवाभावाच्या भावनेने आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी गुरुवारी (ता. २२) येथे केले.

आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर वारकरी भाविकांचे आरोग्य जपण्यासाठी आरोग्य विभागातर्फे २७ ते २९ जून दरम्यान पंढरपूर येथे तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहे. या महाआरोग्य शिबिराच्या नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस दूरदृश्‍यप्रणालीद्वारे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त, आरोग्य सेवा डॉ. धीरजकुमार, तर शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, संचालक, आरोग्य सेवा डॉ. स्वप्नील लाळे, नोडल अधिकारी सदाशिव पडदुने, आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार, भैरवनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाले, की महाशिबिरासाठी नाशिक, कोल्हापूर, पुणेसह विविध आरोग्य मंडळातील अधिकारी, कर्मचारी, सहायक यांच्या सेवा घेण्यात येत आहेत. त्यासाठी शिबिरनिहाय पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक औषधसाठा व यंत्रसामग्री, तयार ठेवावी.

पालखी प्रस्थान ते पालखी प्रवास या दरम्यान ऑक्सिजन, रक्तसाठा, सुसज्ज १०८ रूग्णवाहिकेसह बाइक ॲम्ब्युलन्स सुस्थितीत उपलब्ध ठेवाव्यात. यामध्ये कसलीही तडजोड करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी आरोग्य विभागाच्या वतीने केलेल्या तयारीचे सादरीकरण डॉ. राधाकृष्ण पवार यांनी केले.

दरम्यान, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी महाशिबिरांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशासनाने केलेल्या नियोजनाची व सोयीसुविधांची पाहणी केली व संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Economic Survey 2026: युरियाचा दर वाढवा, थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे, आर्थिक सर्वेक्षण अहवालातून शिफारस

ZP Election 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलल्या

Onion Prices: सोलापूर बाजार समितीत कांदा आठ रुपये किलो

Agriculture Advice: कृषिपूरक योजनेतून शेतकऱ्यांनी उत्पादनात वाढ करावी

Local Body Elections: ६८ जागांसाठी २७१ उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT