Mahavitran Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Abhay Yojana : अभय योजनेतून तीन हजार ग्राहकांना पुन्हा वीज

Electricity : महावितरणने सप्टेंबरपासून वीज जोडणी कायमस्वरूपी तोडलेल्या थकित वीजबिल ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली होती.

Team Agrowon

Latur News : महावितरणने सप्टेंबरपासून वीज जोडणी कायमस्वरूपी तोडलेल्या थकित वीजबिल ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली होती. या योजनेत थकबाकी भरून सहभागी होत जिल्ह्यातील दोन हजार २५८ तर धाराशिव जिल्ह्यातील एक हजार ६८ ग्राहकांना पुन्हा जोडणी देण्यात आली आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ चार दिवसांचा अवधी शिल्लक राहीला आहे. थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकारात सूट मिळत असल्याने अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

३१ मार्चपर्यंत थकित बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. ३० नोव्हेंबरपर्यंतच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जिल्ह्यातील लातूर विभागातील ५७२ वीजग्राहकांनी सहभागी होत लाभ घेतला आहे तर उदगीर विभागातील ७६८ वीजग्राहकांनी सहभाग नोंदवला आहे.

अभय योजनेला सर्वाधिक पसंती निलंगा विभागात मिळाली असून ९१८ वीजग्राहकांनी लाभ घेत पुन्हा जोडणी करून घेतली आहे. तर धाराशिव विभागातील ६४२ वीजग्राहकांनी सहभागी होत लाभ घेतला आहे तर तूळजापूर विभागातील ४२६ वीजग्राहकांनी लाभ घेत विजेची पुन्हा जोडणी सुरू करून घेतली आहे.

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकित बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरुपातील दंड माफ करण्यात येणार आहे. वीजबिलाचा वाद न्यायालयात असलेल्या ग्राहकांनाही या योजनेचा काही अटी व शर्तीवर लाभ घेता येणार आहे. मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून ऊर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यांत भरायची सवलत ग्राहकांना मिळेल.

जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल. उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळेल. वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाइल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात, असे धनंजय पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT