Solapur ZP  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur ZP : ‘झेडपी’ स्वनिधीतून तीनशे तेहतीस शेतकऱ्यांना कडबाकुट्टीचा लाभ

Farmer Subsidy : गेल्या अनेक वर्षापासून कडबाकुट्टीचा लाभ दिला जातो. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना ९ हजाराचे खरेदीसाठी अनुदान दिले जाते.

Team Agrowon

Ahilyanagar News : जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून अहिल्यानगर जिल्ह्यातील ३३३ शेतकऱ्यांना कडबाकुट्टीचा लाभ दिला आहे. त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांना ९ हजाराचे अनुदान कडबाकुट्टी खरेदीसाठी मिळणार आहे. मात्र मागणीच्या तुलनेत हा लाभार्थी संख्या अल्प असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा परिषदे कृषी विभागाअंतर्गत स्वनिधीतून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. गेल्या अनेक वर्षापासून कडबाकुट्टीचा लाभ दिला जातो. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना ९ हजाराचे खरेदीसाठी अनुदान दिले जाते. कडबाकु्ट्टीचा लाभ मिळावा यासाठी मागणी अधिक असते.

यंदा जिल्ह्यातील ३३३ शेतकऱ्यांची कडबाकुट्टीच्या लाभासाठी निवड केली आहे. दरवर्षी जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारशीनुसार लाभार्थी निवड केली जात होती.

सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग प्रशासनाने प्रथम आलेल्या प्राधान्य या या सूत्रानुसार लाभार्थी निवड केली असल्याचे सांगण्यात आले.

कडबाकुट्टीच्या लाभासाठी अनुदान मिळावे याबाबत मागणी अधिक आहे. मात्र मागणीच्या तुलनेत निधी नसल्याने लाभ मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा कडबाकुट्टीचा लाभ देण्याच्या अनुदानावर तीस लाखाचा खर्च केला जाणार आहे.

तालुकानिहाय लाभार्थी...

अकोले ः २७, संगमनेर ः ४१, कोपरगाव ः २३, राहाता ः २३, श्रीरामपूर ः १८, राहुरी ः २३, नेवासा ः ३२, शेवगाव ः १८, पाथर्डी ः २३, कर्जत ः १८, जामखेड ः १०, श्रीगोंदा ः २७, पारनेर ः २३, अहिल्यानगर ः २७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT