Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animal Crop Damage : हरणांच्या कळपाकडून तीन एकर गहू पीक फस्त

Crop Damage : आहे. गेल्या आठ दिवसांपासून या शेतामध्ये रात्रीच्या वेळी हरणांच्या टोळीचा उपद्रव सुरू होता.

Team Agrowon

Nashik News : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मीठसागरे येथे हरणांच्या कळपाने सुमारे तीन एकरातील गव्हाचे पीक फस्त केले आहे. गेल्या आठ दिवसांपासून या शेतामध्ये रात्रीच्या वेळी हरणांच्या टोळीचा उपद्रव सुरू होता.

मीठसागरे शिवारात जाम नदीकाठी जगन मारुती वाघ यांचे शेत आहे. त्यांच्या गव्हाचे पीक ओंबीवर आलेल्या स्थितीत असताना गेल्या आठ दिवसांपासून रात्रीला हरणांचा उपद्रव वाढला होता. कळप शेतात येऊन गव्हाचे पीक खाऊन जायचा.

जाम नदी परिसरात हरणांचे अनेक कळप वास्तव्याला आहेत. गहू, मका, हरभरा यासारखी पिके खाण्यासाठी हे कळप रात्रीच्या वेळी फिरतात. सततच्या नुकसानीमुळे श्री. वाघ यांनी उत्पन्नाची अपेक्षा सोडून दिली होती.

यासंदर्भात त्यांनी वनविभागाकडे तक्रारी केल्या होत्या. गुरुवारी सकाळी शेतात गेल्यानंतर उरलेसुरले गव्हाचे पीकही हरणांनी खाऊन टाकल्याचे आढळून आल्याने त्यांनी कृषी व वनविभागाला कळविले.

नांदूरशिंगोटेचे वन परिमंडळ अधिकारी अनिल साळवे, वनरक्षक चंद्रमणी तांबे, तलाठी श्री. जाधव, पोलिस पाटील राजेंद्र कासार यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. वनविभागाने पंचनामा केला असून श्री वाघ यांना भरपाई देण्यात येईल असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Talathi Recruitment 2026: तलाठी भरतीत कोतवालांना प्राधान्य, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत

Native Seed Conservation: देशी वाणांच्या थेट विक्रीतून उभारले अर्थकारण

El Nino Impact: जागतिक शेतीमाल बाजाराला दुहेरी झटका

Fertilizer Black Marketing : खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात १.६९ लाख धाडी; महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई, लोकसभेत सरकारची माहिती

Gen Z Student Protest: ‘जेन झी’ आंदोलनाच्या निमित्ताने...

SCROLL FOR NEXT