Milk Powder agrowon
ॲग्रो विशेष

Milk Powder : धोरण केंद्राचं मरण शेतकऱ्यांचं; दूध संघांमध्ये हजारो टन दूध पावडर पडून, दूध दरावर थेट परिणाम

Kolhapur Milk Rate : कोल्हापूर जिल्ह्यात हजारो टन दूध पावडर पडून आहे. अपेक्षित दर नसल्याने पावडर विक्री तोट्यात करावी लागत आहे.

sandeep Shirguppe

Milk Price Kolhapur : देशभरात मोठ्या प्रमाणात दुधाची पावडर शिल्लक असताना केंद्र सरकारकडून दूध पावडरच्या आयातीला परवानगी दिली आहे. दरम्यान महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात हजारो टन दूध पावडर पडून आहे. अपेक्षित दर नसल्याने पावडर विक्री तोट्यात करावी लागत आहे. त्यातच केंद्राने घेतलेल्या या निर्णयाने देशातील दूध दरावर थेट परिणाम तर होण्याची शक्यता आहे. तसेच देशात सुमारे दोन लाख टन आणि महाराष्ट्रात सुमारे २० हजार टन दूध पावडर शिल्लक आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात हजारो टन दूध पावडर शिल्लक असताना केंद्र सरकारने आयात शुल्क कमी करून दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याची परवानगी दिली आहे. हा निर्णय दूध संघ व उत्पादकांचे कंबरडे मोडणारा ठरणार आहे. कृषी मालाला हमीभाव आणि दुधाला वाढीव दर देण्याची घोषणा करणाऱ्या केंद्र सरकारची प्रत्यक्ष कृती मात्र वेगळीच असल्याची भावना उत्पादकांमध्ये आहे.

प्रतिकिलो २५० ते २८० रुपये दराशिवाय दूध पावडर विक्री परवडत नाही. सध्या २०५ पासून २३० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दूध पावडर विक्री करावी लागत असतानाच केंद्राने महागाई कमी करण्यासाठी दूध पावडर आयातीचा घेतलेला निर्णय उत्पादकांच्या व संघांच्या मुळावर उठण्याची शक्यता आहे.

कोरोना दरम्यान दूध पावडरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यानंतर, पुन्हा खुला बाजार सुरू झाला आहे आणि दरात मोठी घसरण झाली. प्रतिकिलोचे दर ३३० वरून १८० ते १९० रुपयांपर्यंत खाली आले होते. आता दरात हळूहळू सुधार होऊन ते २०५ ते २३० रुपयांपर्यंत आहेत; मात्र, हेच दर २६० ते २७० पर्यंत असल्याशिवाय दूध पावडर विक्री करणे कोणत्याही दूध संघाला परवडत नाही. त्यामुळे साठा करून ठेवावा लागत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघामध्ये सुमारे सात हजार टन दूध पावडर शिल्लक आहे. त्याची मागणीनुसार विक्री होते. दर नसल्यामुळे संघाने पावडर गोदामांमध्येच ठेवणे पसंत केले आहे. आता केंद्राच्या नव्या निर्णयाने दूध संघापुढे विक्रीचा पेच निर्माण झाला आहे.

गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले म्हणाले की, अपेक्षित दर नसल्याने देशात लाखो टन दूध पावडर शिल्लक आहे. चांगला दर मिळतो त्याचवेळी दूध पावडरची विक्री करावी लागते. यातच दूध पावडर आयातीचा निर्णय घेतला आहे; मात्र, देशात शिल्लक असलेल्या दूध पावडरीचा विचार होऊ शकला असता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT