Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : रब्बी हंगामात यंदा केवळ १९४ कोटी रुपयांचेच वाटप

Rabi Crop Loan : सोलापूर जिल्ह्यात गेल्यावर्षी रब्बी हंगामात तब्बल ४०३ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले होते, पण यंदा आतापर्यंत केवळ १९४ कोटी रुपयांचे पीककर्जवाटप झाले आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात गेल्यावर्षी रब्बी हंगामात तब्बल ४०३ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले होते, पण यंदा आतापर्यंत केवळ १९४ कोटी रुपयांचे पीककर्जवाटप झाले आहे. आतापर्यंतच्या पीककर्जवाटपाचा विचार करता, यामध्ये बँकांचा निरुत्साह दिसत आहे.

यंदा जिल्हा प्रशासनानं रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपासाठी तब्बल २०७२ कोटी रुपयांचा पतआराखडा आखण्यात आला आहे. त्या माध्यमातून जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार शेतकऱ्यांना हे कर्जवाटप करण्यात येणार आहे.

परंतु आतापर्यंत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांकडून ९ हजार ६६३ शेतकऱ्यांनाच कर्जवाटप होऊ शकले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ९७९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

त्यापैकी या बँकांनी ९ कोटी ११ लाख रुपयांचेच वाटप केले आहे. त्यात तर खासगी क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँकांना ४७१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी ४ कोटी ७४ लाख रुपयांचेच वाटप केले आहे.

मुख्यतः बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसिस बँक, पंजाब आणि सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युको बँक या बँका पिछाडीवर आहेत.

जिल्हा बँकेकडून ५३ कोटीचे वाटप

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मागच्यावर्षी ४७ कोटी रुपयांचे वाटप केले होते. यंदा त्यांनी ५३ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. त्यातून ३ हजार ९६५ शेतककऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Market Road Issues: विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटच्या सुविधांवर पाणी

Fake Fertilizer: बोगस खतविक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Vanashree Award: भोकणीला वन विभागाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी धुळ्यातून २१५ विशेष बस

Agrowon Podcast: हरभरा दरात चढ-उतार ,ज्वारीच्या आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार, शेपू दरात स्थिरतातर केळीच्या आवकेत घट

SCROLL FOR NEXT