Maharashtra Assembly  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Cabinet : खानदेशात यंदा चौघांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता

New Cabinet Maharashtra : खानदेशात विधानसभा निवडणुकीत महायुतीला २० पैकी १९ जागा मिळालेल्या आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात विधानसभा निवडणुकीत महायुतीला २० पैकी १९ जागा मिळालेल्या आहेत. खानदेशात या वेळेसही चार जणांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता असून, त्यात भाजपचे तीन व राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) एक मंत्री असेल, अशी स्थिती आहे.

अजित पवार भाजप व शिवसेनेसोबत आल्यानंतर खानदेशात त्यांच्यासोबत सर्वप्रथम अमळनेरचे (जि.जळगाव) आमदार अनिल पाटील हे गेले होते. पाटील यांना महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपदही मिळाले होते. या वेळेसही पाटील यांना मंत्रिपद मिळेल.

कारण खानदेशात राष्ट्रवादी काँग्रेसचे ते एकमेव आमदार आहेत. धुळ्यातही भाजपला यंदा मोठे यश मिळाले आहे. चार जागा भाजपला मिळाल्या आहेत. धुळ्यातही एक मंत्रिपद मिळू शकते. परंतु राज्यभरातील महायुतीची आमदारसंख्या लक्षात घेता पुढील टप्प्यात भाजपला धुळ्यात मंत्रिपद मिळेल, असेही चर्चिले जात आहे.

नंदुरबारात भाजपचे नेते डॉ.विजयकुमार गावित हे विद्यमान मंत्री आहे. ते सलग सात वेळेस निवडून आले आहेत. यामुळे या वेळेसही आदिवासी क्षेत्राला संधी देण्याच्या दृष्टिने मंत्रिपद मिळेल, असे संकेत आहेत. जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे. लोकसभेनंतर विधानसभेतही भाजपला मोठे यश मिळाले आहे. भाजपचे संकटमोचक असे बिरुद असलेले गिरीश महाजन हे सलग सात वेळेस जामनेरातून निवडून आले आहेत.

तेदेखील विद्यमान मंत्री असून, त्यांनी उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठे यश मिळवून दिले आहे. यामुळे त्यांनाही हेवीवेट मंत्रिपद मिळेल, असे संकेत आहेत. शिंदेसेनेचे आमदार गुलाबराव पाटीलहेदेखील जळगाव ग्रामीणमधून सलग तीन वेळेस निवडून आले आहे. २०१४च्या युती सरकारमध्ये ते दुसऱ्या टप्प्यात राज्यमंत्री झाले होते. २०१९ मध्ये उद्धवसेनेकडूनही त्यांना मंत्रिपद मिळाले होते.

नंतर अस्तित्वात आलेल्या महायुतीच्या सरकारमध्येही ते कॅबिनेट मंत्री व जळगावचे पालकमंत्री होते. यामुळे गुलाबराव यांनाही मंत्रिपद मिळेल, असे निश्चित मानले जात आहे. यासोबत शिंदेसेनेचे किशोर पाटील(पाचोरा), भाजपचे संजय सावकारे(भुसावळ), सुरेश भोळे किंवा मंगेश चव्हाण (चाळीसगाव) यांच्यापैकी एकास राज्यमंत्रिपद मिळेल, असेही चर्चिले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Talathi Recruitment 2026: तलाठी भरतीत कोतवालांना प्राधान्य, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत

Native Seed Conservation: देशी वाणांच्या थेट विक्रीतून उभारले अर्थकारण

El Nino Impact: जागतिक शेतीमाल बाजाराला दुहेरी झटका

Fertilizer Black Marketing : खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात १.६९ लाख धाडी; महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई, लोकसभेत सरकारची माहिती

Gen Z Student Protest: ‘जेन झी’ आंदोलनाच्या निमित्ताने...

SCROLL FOR NEXT