Sugarcane Worker agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Worker : चक्क ऊसतोड मजुरांच्या खोपटांवर भूरट्या चोरांचा डल्ला, १४ मोबाईल, प्रापंचीक साहित्य केलं लंपास

Kolhapur Sugarcane : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या रुकडी येथे ऊसतोड मजुरांच्या खोपट्यांमध्ये चोरीची घटना घडली.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugarcane Workar : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या रुकडी येथील ऊसतोड मजुरांच्या खोपट्यांमध्ये चोरीची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणातून रोख ४२०० रुपये १४ मोबाईल व प्रापंचिक साहित्य चोरीला गेले आहे.

सध्या जिल्ह्यात विविध साखर कारखान्यांच्या ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आल्या आहेत. त्यांच्या राहत्या खोपट्यावर कोणीही नसलेले पाहून काही ठिकाणी भरदिवसा तर काही ठिकाणी मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारल्याने मजुरांचे नुकसान झाले आहे.

आठ दिवसांत तब्बल तीन ठिकाणी चोरी झाल्याने मजुरांत भीतीचे वातावरण आहे. रुकडी ते चोकाक रोड वर उदयसिंग गायकवाड साखर कारखान्याच्या ३५ कोयत्यांची टोळीतील तब्बल ७ मोबाईल चोरीस गेले, तर याच दिवशी शिवाजी नाईक यांच्या जागेत वास्तव्यास असलेल्या पंचगंगा कारखान्याच्या टोळीतूनही ७ मोबाईल चोरीस गेले.

शनिवार (ता.१६) भर दुपारी रुकडी-गांधीनगर मार्गावर असणाऱ्या पाण्याच्या टाकी मागे असणाऱ्या राजू ढवळे यांच्या शेतामध्ये राजाराम व पंचगंगा साखर कारखान्याच्या टोळ्यांतील पीठाचे डबे, गॅस शेगडी, सिलिंडर, भांडी, ८ कोयते, ताट, वाटी, कढई, सरपन इ. सह प्रापंचिक साहित्य चोरीला गेले. त्यामुळे मजुरांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याची माहिती राजाराम कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांना कळताच सर्कल प्रमुख अनिकेत खडिकर यांना पाचारण केले.

याबाबत राजाराम कारखान्याने संचालक विजय भोसले यांच्याशी चर्चा केल्यास ते म्हणाले, मजूर पहाटे लवकर मुलाबाळांसह ऊस तोडण्यासाठी जातात यामुळे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांनी डल्ला मारल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजते आहे. परंतु आम्ही ऊस तोडणी मुजरांच्या सुरक्षेबाबत विचाराधीन असल्याचे ते म्हणाले.

आधार फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप बनकर, सरपंच प्रतिनिधी संतोष रुकडीकर, पोलीस पाटील कविता कांबळे मदतीसाठी धावून आले. या वेळी राजारामचे संचालक विजय भोसले, पंचगंगेचे सुमित पाटील, उदय साखरचे शीतल चौगले, राजू चव्हाण हे उपस्थित होते.

ऊसतोडीचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता

हातकणंगले पोलीस ठाण्यात या घटनेची अजूनही नोंद झालेली नाही. अशा घटना वारंवार घडत असून, मजुरांनी रुकडीत राहायचेच नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे ऊसतोडीचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT