Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Jaljeevan Water Scheme : पाणीयोजनेच्या कामाला मुहूर्त मिळेना

Water Issue : अद्याप कामाला सुरुवातही न झाल्‍याने निडीतर्फे अष्टमी ग्रामस्थांनी व महिलांनी पंचायत समितीच्या कार्यालयावर बुधवारी धडक देत हल्लाबोल केला व गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांच्यासमोर पाणीसमस्‍या मांडली.

Team Agrowon

Roha News : रोहा तालुक्यातील निडीतर्फे अष्टमी गावासाठी जलजीवन योजनेच्या माध्यमातून पाणी योजना मंजूर झाली आहे. घरोघरी नळजोडणीचे काम सुरू करण्याचे आदेशही ऑक्टोबर २०२३ मध्ये देण्यात आले आहेत. परंतु अद्याप कामाला सुरुवातही न झाल्‍याने निडीतर्फे अष्टमी ग्रामस्थांनी व महिलांनी पंचायत समितीच्या कार्यालयावर बुधवारी धडक देत हल्लाबोल केला व गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांच्यासमोर पाणीसमस्‍या मांडली.

तालुक्यातील डोंगर-दुर्गम भागातील अनेक गावे अद्याप पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. हंडाभर पाण्यासाठी महिलांना कैक मैल पायपीट करावी लागते. असे असताना निडी गावासाठी मंजूर झालेल्‍या पाणी योजनेच्या कामाचा अद्याप मुहूर्त न मिळाल्‍याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्‍त होत आहे.

पहिल्या टप्प्यात जलजीवनच्या माध्यमातून योजना मंजूर झाली असून समाविष्ट कामे पूर्ण झाल्याने ठेकेदाराला बिलही दिली आहेत. मूळ योजनेत विहीर, पंप हाऊस व नवीन पंपाचा समावेश होता. १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून २०२०-२१ मध्ये अंतर्गत नळजोडणीसाठी एक लाख ९७ हजार रुपये,

जलवाहिनी दुरुस्तीसाठी एक लाख २० हजार, टाकी दुरुस्तीसाठी ९० हजार व पंप दुरुस्तीसाठी ४० हजारांची तरतूद केली आहे. कामे लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा करून अंदाजपत्रकेही ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन दिली. तरी अधिकारी, सरपंच चालढकल करत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयात धडक आपली व्यथा मांडली.

निडीतर्फे अष्टमी गावात पाणी समस्या गंभीर आहे. जलजीवन योजनेच्या कामाबाबत संबंधित अधिकारी वर्गाकडून माहिती घेऊन कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्‍न सुरू असून त्‍यादृष्‍टीने उपाययोजना सुरू केल्‍या आहेत.
शुभदा पाटील, गटविकास अधिकारी, रोहा पंचायत समिती
ग्रामस्‍थांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक पाणी उपलब्‍ध करून देणे गरजेचे आहे. गावात नळपाणी योजनेचे काम सुरू असताना मूळ ठेकेदाराने ५१ जोडण्या दिल्या नाहीत. या विषयी जास्त माहिती नसल्‍याने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुढील कार्यवाही केली जाईल.
अक्षरा डोळकर, सरपंच, निडीतर्फे अष्टमी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mulshi Dam: मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद

Ranbhaji Festival: हरितोत्सवासोबत रानभाजी महोत्सवाला प्रतिसाद

Jalna Scam: जालना जिल्ह्यात २४ कोटींच्या घोटाळ्यात २८ जणांवर गुन्हे दाखल

Cotton Crop Protection: पावसानंतर कपाशीवरील रोग आणि किडींचे व्यवस्थापन

Dharashiv Rain: धाराशिव जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करा

SCROLL FOR NEXT