Maize Research  Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Research Center : कोल्हापूरच्या मका संशोधन केंद्राचे कार्य प्रशंसनीय

Maize Farming : भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली व भारतीय मका संशोधन संस्था, लुधियाना यांनी एकूण चार शास्त्रज्ञांचे पथक येथील मका संशोधन केंद्रात मका संशोधन पडताळणीसाठी पाठविले होते.

Team Agrowon

Kolhapur News : मका संशोधन केंद्राचे संशोधन कार्य प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन लुधियाना येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मका संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ व मका पैदासकार डॉ. एस. बी. सिंग यांनी केले.

भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली व भारतीय मका संशोधन संस्था, लुधियाना यांनी एकूण चार शास्त्रज्ञांचे पथक येथील मका संशोधन केंद्रात मका संशोधन पडताळणीसाठी पाठविले होते. याचे नेतृत्व डॉ. सिंग यांनी केले. त्यावेळी त्यांनी येथील मका संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांशी संवाद साधला.

मणिपूरमधील इंफाळ येथील मका कीटकशास्त्रज्ञ डॉ. श्रीमती जेती कोन्सम, हरियानामधील कर्नालचे मका कृषी विद्यावेत्ता डॉ. नरेंदर सिंग, हैदराबाद येथील मका रोगशास्त्रज्ञ डॉ. मल्ली आदींचा या पथकात समावेश होता. स्वागत विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अशोक पिसाळ यांनी केले.

या वेळी मका उत्पादक संस्था व मका उत्पादक शेतकाऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेटी देण्यात आल्या. मक्याच्या वनस्पती पैदास शास्त्र, कृषी विद्या व कृषी कीटकशास्त्र विषयाच्या प्रयोगाची पाहणी पथकाने केली. प्रास्ताविक संशोधन केंद्राचे मका पैदासकार डॉ. सुनील कराड यांनी केले. यामध्ये त्यांनी संशोधन केंद्रातील सुरू असलेली विकास कामे व संशोधन कामांची माहिती दिली.

विभागीय कृषी संशोधन केंद्रातील मृदा शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण गजभिये यांनी विभागीय कृषी संशोधन कार्यक्षेत्रात असणाऱ्या जमिनीची माहिती दिली. या वेळी विभागीय संशोधन केंद्रामधील नाचणी पैदासकार डॉ. योगेश बन, कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब कांबळे, पशुविज्ञान तज्ज्ञ डॉ. संभाजी जाधव, कीटकशास्त्र विषयक सुशांत महाडीक, वरिष्ठ संशोधन सहायक ग्रामीण मौसम विभागाचे तंत्रज्ञ डॉ. मयूर सुतार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सुहास भिंगारदेवे यांनी केले. चिनके व मौजे नाझरे (जि. सोलापूर) येथील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आलेल्या मका आद्यरेखा प्रात्यक्षिक प्रक्षेत्राची पाहणी शास्त्रज्ञ पथकाने केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT