Irrigation Project Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Department : आर्वी उपसा सिंचन योजनेचे काम रखडले

Arvi Upsa Irrigation Project : कंपनीच्या निष्काळजीपणामुळे गेल्या आठ वर्षांपासून या आर्वी उपसा सिंचन प्रकल्पाची अंमलबजाणी रखडल्याने शेतकऱ्यांमधून असंतोष व्यक्‍त होत आहे.

Team Agrowon

Vardha News : आर्वी विभागात वर्धा नदीच्या पाण्याचा उपयोग करीत ८४०० हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रस्तावित होते. मात्र संबंधित कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे गेल्या आठ वर्षांपासून या प्रकल्पाची अंमलबजाणी रखडल्याने शेतकऱ्यांमधून असंतोष व्यक्‍त होत आहे.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून वर्धा नदीतील पाण्याचा उपयोग सिंचन कामी करण्याचे प्रस्तावीत होते. या माध्यमातून तब्बल ८४०० हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येणार होती. दिघी, सायखेडा, मारडा, रसुलाबाद, विरुळ क्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार होता.

मात्र गेल्या आठ वर्षांपासून सिंचन योजनाच रेंगाळल्याने हे पाणी शिवारापर्यंत कधी पोचणार? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. उपसा सिंचन योजनेचे कंत्राट एका नामवंत खासगी कंपनीला देण्यात आले होते. परंतु ही कंपनीच सध्या पैशांअभावी अडचणीत असल्याचे सांगितले जाते.

त्यातच कंपनीने सिंचन प्रकल्पासाठी साठविलेल्या साहित्याच्या गोदामाला आग लागली होती. यात मोठे नुकसान झाले. कोट्यवधी रुपयांची हानी या आगीत झाली. हे नुकसान संबंधित कंपनी शासनाकडून वसुलीच्या तयारीत असल्याची देखील चर्चा आहे.

मात्र या साऱ्या गोंधळात आठ वर्षांत या प्रकल्पाचे काम पुढे सरकले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. आमदार दादाराव केचे यांची या संदर्भाने शेतकऱ्यांनी भेट घेत सातत्याने पाठपुरावा केला. परंतु त्याचाही काही एक उपयोग झाला नाही. परिणामी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवा शेतकरी मंच रोहणा यांच्याकडून करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT