Man River Agrowon
ॲग्रो विशेष

Tembhu Irrigation Scheme : टेंभूचे पाणी माण नदीत सोडले

Water Update : टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचे सांगोल्यासाठी आवर्तन सुरू करण्यात आले असून, टेंभूच्या पाण्याने आटपाडी तलाव भरल्यानंतर आता माण नदीत ते पाणी सोडले आहे.

Team Agrowon

Solapur News : टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचे सांगोल्यासाठी आवर्तन सुरू करण्यात आले असून, टेंभूच्या पाण्याने आटपाडी तलाव भरल्यानंतर आता माण नदीत ते पाणी सोडले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थितीत सांगोल्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सांगोला तालुक्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, जनतेला दिलासा देण्यासाठी आमदार शहाजी पाटील यांनी टेंभू योजनेतून आवर्तन सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला होता. टेंभू योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचे नियोजन करण्यासाठी टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार, उपअभियंता गायकवाड, शाखा अभियंता महेश पाटील यांची बैठक घेण्यात आली.

आमदार शहाजी पाटील यांनी टेंभू योजनेतून लाभक्षेत्रातील जुनोनी, हातीद, पाचेगांव जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी या गावातील तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरून टेंभूचे माण नदीमध्ये पाणी सोडून खवासपूर ते मेथवडे पर्यंतचेसर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना टेंभूच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

कोणत्याही गावाला पाणी कमी पडू नये, याची दक्षता घेण्याच्याही सूचना आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात टेंभूचे पाणी मिळाल्याने पिण्याचा पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याने माणनदी नदीकाठावरील सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाण्याचा जनावरांचा चारा, घास, कडवळ, मका या पिकांना सर्वाधिक लाभ मिळणार आहे.

टेंभूचे पाणी माण नदीत आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सांगोल्यातील शेतकऱ्यांना ऐन टंचाईच्या काळात पाणी मिळाल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहेच आणि चाऱ्याचाही प्रश्न सुटणार आहे.
विजय बाबर, सदस्य, पाणी संघर्ष समिती, सांगोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT