Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : वारणा, मोरणा नदीची पाणीपातळी घटली

Water Crisis : शिराळा तालुक्यात चालू वर्षी वळवाचा पाऊस समाधानकारक झाला नाही तसेच आतापर्यंत मॉन्सूनच्या पावसातही जोर दिसत नाही.

Team Agrowon

Sangli News : शिराळा तालुक्यात चालू वर्षी वळवाचा पाऊस समाधानकारक झाला नाही तसेच आतापर्यंत मॉन्सूनच्या पावसातही जोर दिसत नाही. परिणामी वारणानदी व मोरणा नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावली आहे.

चांदोली धरणात सध्या १०.५० टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे. यामधील उपयुक्त वापरण्यायोग्य फक्त ३.६२ टीएमसी पाणी आहे. शिराळा तालुक्यात १० मे पासून वळवाच्या पावसाने सलग सहा दिवस पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने दडी मारली होती, दीर्घ काळ विश्रांतीनंतर गुरुवारी सायंकाळी चार वाजल्यापासून मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

शेतीच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला असला तरी पाणीसाठ्यावर काहीही परिणाम झालेला नाही. पडलेल्या पावसामुळे ऊस पिकांना चांगलेच जीवदान मिळाले आहे. तालुक्यात गुरुवारी मॉन्सूनच्या पावसाने हजेरी लावली असली जोर कमी झाला आहे. चांदोली धरण परिसरात आजअखेर २६० मिलिमीटर पाऊस पडला असून गेल्या २४ तासांत ६१ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

वारणा व मोरणा नदीपात्रात पाणी असले तरी पाण्याची पातळी कमी होऊन पाण्याने तळ गाठला आहे. वारणा व मोरणा नदीकाठी असणाऱ्या सर्व गावांना नदीवरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सर्वच नळ पाणीपुरवठा योजनांची जॅकवेल ही नदी काठावरच आहेत.

नदीतील पाण्याने तळ गाठला असून अनेक ठिकाणी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. याचा विपरित परिणाम नदी काठावरील गावांतील नळ पाणीपुरवठा योजनांवर झाला आहे. नदीतील पाणीपातळी खालावल्याने नळ पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमध्ये अपेक्षित पाणीसाठा होत नाही.

सध्याचा पाणी साठा

मोरणा ११ टक्के

वाकुर्डे बुद्रुक (करमजाई) ८८ टक्के

अंत्री बुद्रुक (करमजाई) २९ टक्के

शिवणी (निरंक), टाकवे १५ टक्के

रेठरे धरण २ टक्के

कार्वे ९ टक्के

(चांदोली धरणात सध्या १०.५० टीएमसी पाणी साठा शिल्लक असून यामधील उपयुक्त वापरण्यायोग्य फक्त ३.६२ टीएमसी आहे.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT