Artificial flowers Agrowon
ॲग्रो विशेष

Artificial flowers: कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालावी

Support Flower Farmers: बाजारपेठेत उपलब्ध होणाऱ्या कृत्रिम फुलांमुळे फुलोत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्यामुळे कृत्रिम फुलांवर बंदी घालावी, अशी मागणी फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Team Agrowon

Kolhapur News: बाजारपेठेत उपलब्ध होणाऱ्या कृत्रिम फुलांमुळे फुलोत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्यामुळे कृत्रिम फुलांवर बंदी घालावी, अशी मागणी फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे, की एकेकाळी कोल्हापूर जिल्हा हा फुलशेतीमध्ये राज्यामध्ये अग्रेसर जिल्हा म्हणून गणला जात होता. हरितगृह शेतीचा विचार केला, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २००० - २०१५ पर्यंत ३०० ते ५०० हरितगृह शेतकरी होते.

मात्र दरम्यानच्या काळामध्ये कृत्रिम फुलांचा भारतीय बाजारपेठेमध्ये शिरकाव झाला. त्यामुळे त्याचा थेट विपरीत परिणाम सर्वप्रथम सर्वसामान्य हरितगृह मधील शेतकऱ्यांना जाणवण्यास सुरुवात झाली. सध्या जिल्ह्यात फक्त ३५ ते ५० शेतकरी हे हरितगृह शेतीमध्ये शिल्लक राहिले आहेत.

या कृत्रिम फुलांच्या अतिरिक्त वापराचा विपरीत परिणाम हा अलीकडील काळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर पारंपरिक फूल शेतीवर होऊ लागला आहे. बाजारपेठेमध्ये सर्वत्र झेंडू, शेवंती, मोगरा यांच्या माळा उपलब्ध आहेत, ऐन सणासुदीला देखील फुलांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही.

त्यामुळे फुलशेतीमधील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळली आहे. फुलशेतीचे क्षेत्र प्रचंड झपाट्याने कमी झाले आहे. शिष्टमंडळात संभाजी शिंदे, बाजीराव काळे, मोहन माने, किरण पाटील, प्रवीण मोरे आदींचा समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season : कर्नाटकचा ‘गनिमी कावा’

Soybean Procurement : हमीभावात सोयाबीन खरेदीचा मुहूर्त दिवाळीनंतरच

Sugar Market : दिवाळीमुळे देशाअंतर्गत साखर बाजारातील तेजी स्थिर

MPKV Rahuri :" महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुलगुरू निवड प्रक्रियेवर ‘बोट’

Sugarcane Season : ऊसदरासह शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

SCROLL FOR NEXT