Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने रब्बीतील ज्वारी, बाजरी भिजली

Crop Damage : सोयगावसह परिसरात शुक्रवारी (ता. २९) पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक अर्धा तास अवकाळी पावसाने हजेरी लावली.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : सोयगावसह परिसरात शुक्रवारी (ता. २९) पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक अर्धा तास अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये रब्बीची कापणी केलेली ज्वारी, बाजरी भिजली.

दरम्यान, गुरुवारी (ता. २८) रात्री अचानक वाढत्या उकाड्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक हवालदिल झाले होते. रात्रभर अचानक उकाडा होऊन शुक्रवारी पहाटे साडेसहा वाजता पावसाने सोयगाव माळेगाव, पिंपरी, जरंडी, निंबायती, बहुलखेडा, कवली, उमर विहिरे, निमखेडा, घोसला आदी भागांत जोरदार अर्धा तास हजेरी लावली.

दरम्यान, नुकत्याच रब्बीच्या पिकांची कापणी केलेल्या बाजरी ज्वारीचे कणीस भिजली आहेत. तर उन्हाळी पिकांची फुलगळ झाली आहे. जरंडी, निंबायती भागात दोन ते तीन मिनिटे बारीक गारा पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र गारा पडल्याच्या प्रकरणी तालुका प्रशासनाने दुजोरा दिला नव्हता.

दरम्यान, शिवना (ता. सिल्लोड) परिसरात दोन दिवसांपासून असह्य उकाडा जाणवत होता. गुरुवारी (ता. २८) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शिवना येथे पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली.

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. एकीकडे उकाडा अन् दुसरीकडे ऊन सावलीचा खेळ अस चित्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शुक्रवारी दुपारपर्यंत बहुतांश भागात पाहायला मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

Papaya Cultivation Completed: खानदेशात पपई लागवड पूर्ण; जळगावात क्षेत्रवाढ

Onion Prices Issue: कमी दरांमुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT