fishery business Agrowon
ॲग्रो विशेष

Fishery business : हर्णे बंदरातील माशांची कोटींची उलाढाल थांबली

Ratnagiri fish market : अचानक बदललेल्या वातावरणामुळे हर्णे बंदरातील मासेमारीला अजूनही ब्रेकच आहे. त्यामुळे दररोजची सुमारे एक कोटीची उलाढाल थांबली आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : अचानक बदललेल्या वातावरणामुळे हर्णे बंदरातील मासेमारीला अजूनही ब्रेकच आहे. त्यामुळे दररोजची सुमारे एक कोटीची उलाढाल थांबली आहे. त्याचा फटका स्थानिक मच्छीमारांना बसला असून मासे खरेदीसाठी येणाऱ्यांची निराशा होत आहे.

शासनाच्या नियमानुसार १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली. पहिला महिना बंपर मासळी मिळत होती. परंतु दर ५० टक्क्यांनी घसरलेले होते. गणेशोत्सवामध्ये बहुसंख्य नौका किनाऱ्यावरच असतात. अनंत चतुर्दशीनंतर म्हणजेच २८ सप्टेंबरनंतर मासेमारीला सुरुवात होणे अपेक्षित होते. परंतु हवामान खात्याने वादळाचा इशारा दिल्यामुळे मच्छीमारांना बंदरात थांबावे लागले. शुक्रवारपासून (ता. २९) जोरदार पाऊस व वेगवान वारे वाहू लागले. त्यानंतर मंगळवारपर्यंत (ता. ३) वातावरण ‘जैसे थे’ आहे.

पुढील चार दिवस मच्छीमारांना शांतच बसावे लागणार असल्याचे पाजपंढरी येथील श्रीराम मच्छीमार सोसायटीचे संचालक व हेमंत चोगले यांनी सांगितले. हर्णे येथील बंदरावर दररोज मासळी विक्रीतून सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल होते. येथील मासा निर्यात होतो. वातावरणातील बदलाचा फटका मच्छीमारांना बसला आहे. सध्या येथील बंदरावर किनारी भागात पागून (हाताने जाळी टाकून) आणलेल्या माशांची विक्री होत आहे. त्याचे दर वधारलेले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT