Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फळ बागायतदारांनाही पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा

PMFBY Premium : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीपोटी राज्य सरकारने त्यांच्या हिस्सा विमा कंपनीला रक्कम अदा केला आहे. त्यामुळे मृग बहारात नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येणार आहे.

Swapnil Shinde

Fruit Crop Insurance News : नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक योजना मृगबहार राबवण्यात येत आहे. आज फळपीक विमा योजनेचा राज्य शासनाने त्यांचा हिस्सा २७ लाख ११ हजार १४० रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच फळपीक विम्याची रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होते. अशा नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी विमा संरक्षणाची खूप गरज आहे. मृग बहार २०२२ मधील संत्रा, मोसंबी, डाळींब, काजु, केळी, द्राक्ष, आंबा, स्ट्राबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी शासनाने हवामान आधारित पिक विमा योजना लागू केली आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट या हवामान धोक्यांपासून या योजनेंतर्गत संरक्षण दिले जाते.

शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळण्यासाठी एचडीएफसी एग्रो जनरल इन्शुरन्स, रिलायन्स जनरल इन्शुरन्स व भारतीय कृषी विमा कंपनीची नेमणूक केली होती. त्यांना पीएमएफबीवायनुसार राज्याचा हिस्सांची 16 कोटी 93 लाख 74 हजार 251 होता. त्यानुसार यापूर्वी राज्य शासनाने 16 कोटी 66 लाख 63 हजार 111 रुपये वितरीत होते.

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत सन 2022 मृग बहारासाठी प्रलंबित असलेली 27 लाख 11 हजार 140 इतका रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी नुकसान झालेल्या पीक विम्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकर मिळण्यास मदत होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT