Cashew Crop
Cashew CropAgrowon

Cashew Production : काजू फळपीक विकास योजनेचा लाभ घ्या

Cashew Market Rate : काजूचा सर्वकष विकास विचारात घेऊन काजू उत्पादकांसाठी योजना राबविण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून काजू उत्पादकांची होती.
Published on

Sindhudurg Cashew Rate : ‘‘काजूच्या सर्वकष विकासासाठी शासनाने कोकणातील पाच जिल्हे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी काजू फळपिक विकास योजना सुरू केली आहे. या योजनेचा काजू उत्पादकांनी लाभ घ्यावा,’’ असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले.

काजूचा सर्वकष विकास विचारात घेऊन काजू उत्पादकांसाठी योजना राबविण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून काजू उत्पादकांची होती. या वर्षीच्या अर्थसंकल्पात काजू विकास योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे.

त्यामुळे आता काजू पीक विकास योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात होईल. कोकणातील सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर व कोल्हापूर जिल्ह्यांतील चंदगड व आजरा तालुक्यांतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.’’

Cashew Crop
Cashew Rate : काजू बीचा दर किलोला १०५ वरच स्थिरावला

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेमार्फत खासगी क्षेत्रातील रोपवाटिका स्थापन व बळकटीकरणासाठी ५० गुंठे ते जास्तीत जास्त १ हेक्टर क्षेत्रासाठी ७ लाख ५० हजार रुपये, प्लॅस्टिक आच्छादनासह शेततळे बांधण्यासाठी ७५ हजार रुपये, जिल्हा परिषदेमार्फत सिंचनासाठी विहीर खोदण्यासाठी २ लाख ५० हजार प्रतिविहीरअनुदान देण्यात येईल.

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. हा अर्ज महा ई- सेवा केंद्र किंवा कृषी विभागाच्या तालुक्यास्तरीय कार्यालयातून करता येईल. त्यासाठी अर्जासोबत सातबारा, ८ अ, बॅंक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, आधारकार्ड आदी कागदपत्रे जोडून अर्ज ऑनलाइन करायचा आहे.- प्रमोद बनकर, तालुका कृषी अधिकारी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com