Sugarcane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन दोनशे रुपये द्यावा

Team Agrowon

Kolhapur News : गत हंगामात तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन दोनशे रुपये द्यावा मगच कारखान्याची धुराडी पेटवा असा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ‘स्वाभिमानी’ची २३ वी ऊस परिषद २५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर होणार असल्याचेही त्यांनी शनिवारी (ता. ५) कल्पवृक्ष गार्डनमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घोषित केले.

श्री. शेट्टी म्हणाले, की देशातील व राज्यातील साखर उद्योग स्थिरावला आहे. साखरेसह उपपदार्थाला चांगले दर मिळाले आहेत. मात्र राज्यातील साखर कारखानदार एफआरपी वगळता दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत.

राज्य सरकार कारखादारांच्या पाठीशी असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात संघर्ष केल्याशिवाय काहीच पडणार नाही. केंद्र व राज्य सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवित असताना विरोधी पक्ष मूग गिळून गप्प आहे.

प्रा. जालंदर पाटील म्हणाले, की चळवळीतील ताकत व उमेदच सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकते यामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानीची चळवळ अव्याहतपणे सुरू राहील. शेतकरी संघटित करण्याच काम स्वाभिमानीने केले आहे. राज्यातील चळवळीतील सर्व छोटे पक्ष एकत्रित करून परिवर्तन महाशक्ती आघाडी जनतेसमोर सक्षम पर्याय उभा राहिला आहे.

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, जनार्दन पाटील, विठ्ठल मोरे, अजित पोवार, सचिन शिंदे, राजाराम देसाई, राम पाटील, पोपट मोरे यांच्यासह स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शैलेश आडके यांनी केले. सूत्रसंचालन विक्रम पाटील यांनी केले.

एक लाख शेतकऱ्यांची उपस्थिती

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूर येथे २५ ऑक्टोबरला होणाऱ्या ऊस परिषदेला महाराष्ट्र, कर्नाटकातून एक लाख शेतकरी उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर गावागावात बैठकांचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे सावकर मादनाईक यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Rate : कापसाचे दर वाढण्याची चिन्हे?

Indian Politics : निकालांनंतरचा सत्तासंघर्ष

Soybean Farmers : कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हा, कोल्हापूर बाजार समितीकडून इशारा

Bhuibawda Ghat : भुईबावडा घाटरस्ता रविवारपर्यंत बंदच, फोंडाघाट मार्गे वाहतूक

Kolhapur Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो, गवार, रताळ, बटाटा भाव वाढले, कोथिंबीर मात्र कवडीमोल भावात

SCROLL FOR NEXT