Dhom Dam Burst Agrowon
ॲग्रो विशेष

Dhom Dam Burst : धोमच्या उजव्या कालव्याला भगदाड; पाणी ओढ्यातून वाहून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान टळले

Right canal Burst of Dhom Dam : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात साताऱ्यातील धोम धरणाचा डावा कालवा फुटला होता. तो रात्री मध्यरात्री फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले होते. तसेच पाणी शिरल्याने गाढ झोपेत असणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्या आणि संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते. तर बैल वाहून गेले होते. या घटनेला अजून दोन महिनेही ओंलडत नाहीत तोवर दुसरी घटना घडली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : सातारा जिल्ह्यातील वाई तालूक्यातील धोम धरणाचा डावा कालवा फुटल्याची घटना दोन एक महिन्यांपूर्वी घडली होती. पांडे गावच्या हद्दीत मध्यरात्री हा डावा कालवा फुटला होता. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे आणि ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांचे नुकसान झाले होते. तर त्यांची उपजीविकाचे असणारे साधन म्हणजेच बैल वाहून होते. यानंतर आता पुन्हा व्याजवाडी परिसरात धोम धरणाचा उजवा कालवा फुटला. सुदैवाने यात कोणतेही नुकसान झाले नसून हजारो लिटर पाणी मात्र वाया गेले आहे. यामुळे सध्या पाटबंधारे विभागावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच विभागाने केलेल्या कालव्यांच्या सर्वेक्षणावर संशय व्यक्त केला जात आहे.

मात्र लाखो लिटर पाणी गेले वाया

साताऱ्यातील व्याजवाडी परिसरातील असणाऱ्या धोमचा उजव्या कालव्याला भगदाड पडल्याने एकच खळबळ उडालेली आहे. तर एकचा महिन्यात वाई तालूक्यात दोन ठिकाणी कालवा फुटल्याने शेतकऱ्यांकडून संपात व्यक्त केला जाऊ लागला आहे. तर हा कालवा फुटल्यानंतर पाणी ओढ्यातून वाहून गेल्याने शेती नुकसानीचा अनर्थ टळले. मात्र लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

कालवा १९०/२०० क्युसेसने सुरु

मागील पन्नास एक दिवसापासून येथील उजव्या कालव्यातून १९०/२०० क्युसेसने पाणी पुरवठा सुरू होता. यामुळे येथे शेतीच्या पाण्याचा प्रश्न माग्री लागला होता. पण कालवा फुटल्याने आता कालव्यास पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे आता पाण्याअभावी शेतीचे नुकसानीला शेतकऱ्यांना पुन्हा सामोरे जावं लागणार आहे.

आधी डावा आणि आता उजवा कालवा

साताऱ्यातील धोम धरणाचा डावा कालवा हा डिसेंबर २०२३ मध्ये पांडे गावच्या हद्दीत मध्यरात्री फुटला होता. यावेळी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात कालव्याचे पाणी शिरले होते. ज्यामुळे ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांत पाणी शिरले होते. यामुळे त्यांच्या संसारपयोगी साहित्यासह १४ बैल वाहून गेले होते. पण सुदैवाने बैल वाचवण्यात यश आल्याने लाखोंचे होणारे नुकसान टळले होते.

दरम्यान याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी घाव घेतली होती. तर पाटबंधारे, प्रशासन अधिकारी, किसन वीर कारखान्याचे पदाधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT