Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविम्याचा परतावा २० तारखेपर्यंत जमा होणार

Return of Crop Insurance : पंतप्रधान पीकविमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांअंतर्गत दोन लाख ५४ हजार ३३३ शेतकऱ्यांना १७८ कोटी ६१ लाख रुपये परतावा मंजूर आहे.

Team Agrowon

Nanded News : पंतप्रधान पीकविमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांअंतर्गत दोन लाख ५४ हजार ३३३ शेतकऱ्यांना १७८ कोटी ६१ लाख रुपये परतावा मंजूर आहे. हा परतावा वाटपाची कारवाई वीस तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले आहेत.

यानुसार शिल्लक असलेल्या एक लाख ४१ हजार ५७५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११९ कोटी रुपये लवकर जमा होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी विमा भरला होता. अशा शेतकऱ्यांचे स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांअंतर्गत झालेल्या नुकसानीबाबत भरपाई देण्याच्या सूचना दिल्या होत्या.

यानुसार ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीसंदर्भात पूर्वसूचना (दावे) दिल्या अशा दोन लाख ५४ हजार ३३३ शेतकऱ्यांना १७८ कोटी ६१ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला. हा परतावा सध्या पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटपाची प्रक्रिया पीकविमा पोर्टलच्या माध्यमातून सुरू आहे.

हा पीकविमा आधार प्रणालीशी जोडलेल्या बँकखात्यामध्ये जमा होत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. आजपर्यंत एक लाख ४१ हजार ५७५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११९ कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरित पीकविमा वाटवाची कारवाई २० ऑगस्ट ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याची सूचना विमा कंपनीला दिली आहे.

त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी विमा वाटपाची कारवाई पूर्ण होईपर्यंत विमा भरपाई मिळण्याची वाट पाहावी. ही परतावा वाटपाची कारवाई पूर्ण होऊनदेखील नुकसान भरपाई मिळाली नसल्यास विमा कंपनीच्या तालुकास्तरावरील कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी शेतकऱ्यांना केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT