Vegetable Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Commodity Prices : शेतीमाल दराचे वास्तव

मजुरीचे दरही चौपट वाढले आहेत. २०१३ ला ट्रॅक्टर ट्रॉली रोटर मशीनसह सहा लाखात सहज बसून जात होते आज तेच संपूर्ण सेट घेतला तर ११ लाख लागत आहेत.

Team Agrowon

मिलिंद काळे

Indian Agriculture : २०१३ मध्ये मी कापूस ७५०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे विकला होता आणि २०२३ ला दोन दिवसांपूर्वी मी कापूस ७९०० रुपये प्रतिक्विंटलने विकला आहे. फरक इतकाच आहे २०१३ मध्ये डिएपी ५६० रुपयाला एक बॅग होती आज त्या बॅगची किंमत १९०० रुपये झाली आहे.

तेव्हा कापूस वेचणी मजुरी तीन रुपये प्रतिकिलो होती आता १० रुपये प्रतिकिलो वेचणी झाली आहे. मजुरीचे दरही चौपट वाढले आहेत. २०१३ ला ट्रॅक्टर ट्रॉली रोटर मशीनसह सहा लाखात सहज बसून जात होते आज तेच संपूर्ण सेट घेतला तर ११ लाख लागत आहेत.

तेव्हा मिळणारा १५ हजाराचा बैल आज ५५ हजाराचा झाला आहे. आधी ५० हजार रुपयांना मिळणारी मोटारसायकल ज्यात ६० रुपये लिटरप्रमाणे पेट्रोल टाकून गावोगावी चहा पावडर, भांडी, कपडे, कुल्फी, भेळ असे काही विकून उदरनिर्वाहासाठी दोन पैसे कमवत होते.

आज तिचं मोटारसायकल एक लाख १० हजारांवर नेऊन ठेवली आहे. आणि पेट्रोलचे दर ११० रुपये प्रतिलिटर झाले आहेत. साधारण एकंदरीत कोणतीच गोष्ट सोपी नाही ठेवली.

देशात एकंदरीत पाहिल्या गेले तर शेतकरी २५ रुपये प्रतिकिलोने गहू विकत आहे तोच गहू दुकानदार ५० रुपये प्रतिकिलोने विकतो आहे. धान्याचा सर्वत्र काळा बाजार जोरात सुरू असून तरी जनता मूग गिळून गप आहेत.

वरील सर्व वाढलेल्या किमतींच्या मानाने आज कापसासह इतरही शेतीमालास काय भाव असावेत, हे शासनानेच सांगावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Produce Processing: शेतकरी उत्पादकासोबत प्रक्रियादार, निर्यातदार व्हावा : मंत्री रावल

Irrigation For Agriculture : शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी मिळणे हीच प्राथमिकता

Blue Green Algae: भात पिकासाठी निळे-हिरवे शेवाळ ठरते फायदेशीर; नत्राची बचत करण्यासाठी मदत

Sindhudurg Rain Update: सिंधुदुर्गात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता

Solapur ZP : ६८ सदस्य, ८५ कोटी निधी, तरीही गणित जुळेना

SCROLL FOR NEXT