Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Rate : सोयाबीन विक्री करावे की साठवावे हा प्रश्‍न

Soybean Farmer Issue : विदर्भातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर दबावात आहेत. त्यामुळे सोयाबीन विकावे की तारण ठेवावे, अशा विवंचनेत शेतकरी अडकला आहे.

Team Agrowon

Amravati News : विदर्भातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर दबावात आहेत. त्यामुळे सोयाबीन विकावे की तारण ठेवावे, अशा विवंचनेत शेतकरी अडकला आहे. सोयाबीनची साठेबाजी केल्यास एकाचवेळी ते बाजारात येऊन दर आणखी कोसळण्याची भीती आहे.

त्यामुळे अमरावती बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून सोयाबीनची आवक चार हजार क्‍विंटलवरुन दुपटीने वाढत आठ हजार क्‍विंटलवर गेली आहे. अमरावती बाजार समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात सोयाबीनचे दर किमान ४ हजार ४५० तर कमाल ४ हजार ५६२ रुपयांवर स्थिरावले आहेत.

महिनाभरापासून याच दराने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. परिणामी येत्या काळातही या दरात सुधारणा होण्याची शक्‍यता नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे दरवाढीच्या प्रतीक्षेत सुरवातीला सोयाबीन बाजारात न आणणाऱ्या शेतकऱ्यांनी आता मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारात आणले आहे. त्यामुळे अमरावती बाजार सुरवातीला अवघ्या ४१०० क्‍विंटलची आवक होत असताना आता ही आवक ८ हजार ६३५ क्‍विंटलवर पोचली आहे.

येत्या काळात ही आवक आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. सुमारे दहा हजार क्‍विंटलवर आवक पोचेल, असा दावा केला जात आहे. शेतकऱ्यांना कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी पैशाची गरज आहे. त्यासाठी त्यांच्याकडून शेतीमाल विक्रीसाठी आणला जात आहे.

केंद्र सरकारकडून ग्राहकांच्या हितापोटी आयात-निर्यात धोरण राबविण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे बाजारात सर्वच शेतीमालाचे दर दबावात आले आहेत. या स्थितीत अल्पसंख्याक शेतकऱ्यांसाठी कोणतीच नीती नाही. केवळ निवडणूकांपुरताच सर्वच पक्षांना शेतकरी आठवतो.
मनीष जाधव, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT