Vasantrao Naik Marathwada Agricultural University Agrowon
ॲग्रो विशेष

VNMKV : कृषी विद्यापीठातील शिक्षणांमध्ये मुलींचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले

VNMKV Vice Chancellor Dr. Indra Mani Mishra : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विविध पदवी, पदव्युत्तर तथा आचार्य शिक्षणांमध्ये मुलींचे प्रमाण सध्या जवळ जवळ ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, हा एक सकारात्मक बदल आहे,

Team Agrowon

Dharashiv News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विविध पदवी, पदव्युत्तर तथा आचार्य शिक्षणांमध्ये मुलींचे प्रमाण सध्या जवळ जवळ ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, हा एक सकारात्मक बदल आहे, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी व्यक्त केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील सर्व महिलांच्या आरोग्यात सुधारणा करून जिल्ह्यास महिला ‘स्वस्थ जिल्हा बनवू’ असे ही कुलगुरू म्हणाले. कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर, एकात्मिक बाल विकास योजना तुळजापूर, संपदा ट्रस्ट तुळजापूर आणि ग्रामऊर्जा फाउंडेशन धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी कुटुंब आरोग्य जनजागृती कार्यक्रमाच्या उद्‍घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वनामकृवीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, दीपक काशाळकर कृषी महाविद्यालय धाराशिवचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. एम. बी. पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी किशोर गोरे, सौ. इंदूमती राठोड, संपदा ट्रस्टचे प्रकल्प समन्वयक श्री. विकास गोफणे, ग्राम ऊर्जा फाउंडेशन धाराशिवचे कार्यकारी संचालक दादासाहेब गायकवाड, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरचे कार्यक्रम समन्वयक इंजि. सचिन सूर्यवंशी इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

डॉ. मणी पुढे म्हणाले, की महिला करुणा, दया, प्रेमाची प्रतिकृती असून तिच्यावर सर्व कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी असते. परंतु त्याकरिता ती महिला स्वतः आरोग्य संपन्न, स्वस्थ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच वनामकृवि, परभणीच्या संशोधकांनी महिलांना पौष्टिक खाद्य पुरवण्याकरिता ज्वारी-बाजरीच्या लोह-झिकयुक्त निरनिराळ्या वानांचे संशोधन केले.

कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या मदतीने जिल्ह्यातील महिलांकरिता एक हेल्थ कार्ड बनवून त्यामध्ये वैयक्तिक महिलांचे आरोग्याची मासिक, त्रैमासिक वर्गीकरण करण्यात येईल. डॉ. गोखले म्हणाले, की सारखे कामात गुंतून राहिल्यामुळे महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत. त्याकरिता महिलांना आरोग्य संबंधित प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. प्रास्ताविक इंजि. सचिन सूर्यवंशी, सूत्रसंचालन वर्षा मरवाळीकर, आभार डॉ. विजयकुमार जाधव यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Famer Relief Fund: पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदतीचे पैसे थेट खात्यात मिळणार; पॅकेजबाबत अजित पवारांची ग्वाही

ZP Reservation : जिल्हा परिषद आरक्षण जाहीर

Crop Damage: 'अतिवृष्टीनं पीक नष्ट झालं, गाव, घर सोडावं लागलं, 'या' दिवाळीत साडी घेणं तर दूरच', गोष्ट एका महिला शेतकऱ्याची

Turmeric Farming : शेतकऱ्यांनी हळदीचे रेसिड्यू फ्री उत्पादन घेण्यासाठी पुढाकार घ्या

Fruit Crop Insurance : सांगलीत ३४४ शेतकऱ्यांनी घेतला फळपीक विमा

SCROLL FOR NEXT