Pandharpur Wari Agrowon
ॲग्रो विशेष

Pandharpur Wari: काटेवाडीत मानाच्या मेंढ्यांचा रिंगण सोहळा उत्साहात

Ashadhi Ekadashi 2025: बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे शुक्रवारी (ता. २७) जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या मेंढ्यांचे रिंगण भक्तीच्या लहरींनी न्हाऊन निघाले.

Team Agrowon

Pune News: बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे शुक्रवारी (ता. २७) जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या मेंढ्यांचे रिंगण भक्तीच्या लहरींनी न्हाऊन निघाले. ‘‘राम कृष्ण हरी, ज्ञानोबा-तुकोबा’’ असा जयघोष करीत, वैष्णवांच्या अपार उत्साहात, मानाच्या मेंढ्या रिंगणात धावल्या. हा मनोहारी आणि भक्तिमय सोहळा अनुभवण्यासाठी लाखो भाविकांनी हरिनामाचा गजर करीत गर्दी केली.

पंढरीचा रंग रंगला जगीं ।

विठ्ठलाचे भक्त उभे रंगी ।।

हरिनामाचा गजर गर्जे ।

तुकोबांचे प्रेम हृदयी सजे ।।

या अभंगाप्रमाणे काटेवाडीच्या रिंगण सोहळा सजला होता. पंढरीच्या वारीत वारकऱ्यांचा उत्साह आणि हरिनामाचा गजर यातून विठ्ठल भेटीची ओढ रुजते. काटेवाडीत पार पडलेल्या मेंढ्यांच्या रिंगण सोहळ्यातील भक्तीच्या रंगात हा आनंद सामावलेला दिसला. आषाढी वारीच्या पवित्र प्रवासात, संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा टप्प्याटप्प्याने पंढरपूरकडे निघाला आहे.

बारामती येथील विश्रांतीनंतर पालखी काटेवाडीत भोजन आणि आरामासाठी थांबली. येथून सणसरकडे मार्गस्थ होताना मेंढ्यांचे रिंगण हा अनोखा सोहळा पार पडला. पालखी गावात पोहोचताच, ग्रामस्थांनी हरिनामाच्या जयघोषात भक्तिमय स्वागत केले. परंपरेनुसार, परीट समाजाने पालखीच्या मार्गावर धोतराच्या पायघड्या अंथरल्या, तर ग्रामस्थांनी वेशीपासून विश्रांती ठिकाणापर्यंत खांद्यावरून पालखी सन्मानाने नेली.

सणसरकडे मार्गस्थ होताना बस स्थानकावर मेंढ्यांचा अभूतपूर्व रिंगण सोहळा पार पडला. तात्यासो मासाळ, महादेव काळे, सुभाष मासाळ, जालिंदर महारनवर, उत्तम हाके, विकास केसकर, गुलाब महारनवर, पाटोळे आदींच्या मेंढ्यांनी पालखी भोवती पाच प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगर जिल्ह्यात महिनाभरात ३० हजार हेक्टरवरील पिके बाधीत

Urea Stock: चंद्रपूर जिल्ह्यात युरियाचा वीस हजार टन साठा शिल्लक

SCROLL FOR NEXT